एसटी कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करावी

कास्ट्राईब परिवहन कर्मचारी संघटनेची मागणी
एसटी कर्मचाऱ्यांना विशेष रजा मंजूर करावी

नाशिक | Nashik

करोनाने बाधितांची संख्या वाढत आहे. यात एसटीचे कर्मचारीदेखील बाधित होत असून बाधित कर्मचारी व अधिकाऱ्यांना करोना आजाराच्या कालावधीची विशेष रजा देण्याचा निर्णय घेण्यात यावा, कंटेन्मेंट झोन, रेड झोनमध्ये राहणाऱ्या कर्मचाऱ्यांना हजेरी देण्यात यावी.

तसेच कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली. त्यांना पुन्हा कामगिरीवर घेण्यात यावे, अशी मागणी कास्ट्राईब राज्य परिवहन कर्मचारी संघटनेने केली आहे.

करोना संकटात कामगिरी केलेल्या कर्मचाऱ्यांना काही विभागात प्रोत्साहन भत्ता देण्यात आला नाही, तो तत्काळ द्यावा. ५० लाखांचा विमा योजनेतील जाचक अटी रद्द करण्यात याव्यात.

अनुकंपा तत्त्वावर तसेच वारसा हक्क त्वावरील नेमणूका देण्यात याव्यात, सेवानिवृत्त अधिकारी यांना करार पद्धतीने नेमणूका देण्यात येऊ नये. स्वेच्छानिवृत्ती योजनेचा लाभ घेऊ इच्छिणारे कर्मचारी अधिकाऱ्यांना एक वर्ष किंवा सहा महिन्यांचा पगार व एका अवलंबिताला नोकरी मिळावी, यांसह विविध मागण्या संघटनेने केल्या आहेत.

करोना आजाराच्या कालावधीची रुग्णालयाची बिले मंजूर करण्यासाठी २ सप्टेंबर पासून का?, करोनामुळे मार्च २०२० पासून राज्य परिवहनचे कर्मचारी, अधिकारी बाधित होऊन आजारी पडले होते. किमान २०० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे.

त्यांच्या रुग्णालयातील खर्चाची बिले मंजूर करण्यात यावी, ५० लाखांच्या विमा योजनेतील जाचक अटी रद्द करून जास्तीत जास्त कामगारांच्या कुटुंबाला ५० लाखांचा विमा योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com