महिंद्रा कामगार कुटुंबियांना कंपनीची विशेष मदत योजना

महिंद्रा कामगार कुटुंबियांना कंपनीची विशेष मदत योजना

सातपूर । Satpur

महिंद्रा कंंपनीने आपल्या कर्मचार्‍यांसाठी मदत योजना जाहीर केली असून करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचार्‍याचे पाच वर्षांचे वेतन आणि वार्षिक उत्पन्नाच्या दुप्पट रक्कम त्यांच्या कुटुंबाला देण्याचे जाहीर केले असल्याचे महिंद्रा समूहाचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनीश शाह यांनी कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात स्पष्ट केले.

देशात करोना संसर्गाच्या वाढत्या घटनांमुळे भारतीय उद्योग जगताने आपल्या कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांना मदत करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. यासह ते केंद्र आणि विविध राज्य सरकारला मदत करण्यासाठी पावले उचलत आहेत. अनेक कंपन्या कोविड आजाराने संक्रमित झालेल्या कर्मचार्‍यांच्या कुटूंबियांना आर्थिक मदत, औषधे आणि इतर मदत पुरवित आहेत.

महिंद्रा अँड महिंद्राने आपल्या कर्मचार्‍यांसाठी फॅमिली सपोर्ट पॉलिसी आणली आहे. या अंतर्गत कंपनी आपल्या कोणत्याही कर्मचार्‍याच्या मृत्यूनंतर त्याच्या मुलांच्या 12 वीपर्यंतच्या शिक्षणासाठी प्रत्येक मुलाला वर्षाकाठी दोन लाख रुपयांपर्यंतची मदत करणार आहे.

अनिस शाह यांनी महिंद्राच्या 25 हजार कर्मचार्‍यांना लिहिलेल्या पत्रात की, कोविडच्या प्रादुर्भावामुळे पीडित असलेल्या कुटुंबांवरील ओझे कमी करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. काही कुटुंबांना आपल्या प्रिय व्यक्तीच्या अचानक निधनाचा सामना करावा लागला आहे. त्याचवेळी घर चालवण्याची अनपेक्षित जबाबदारी स्वीकारावी लागली आहे. अशावेळी तुम्ही एकटे नाही आहात. तुमच्या मदतीसाठी आम्ही सज्ज आहोत असा विश्वास त्यांनी पत्राद्वारे कामगारांंना दिला आहे

महिंद्राचा ग्राहकांनाही दिलासा

कंपनीने ग्राहकांना घराबाहेर पडताना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. लॉकडाऊनमुळे ग्राहक त्यांची कार सर्व्हिस सेंटरवर नेऊ शकत नाहीत. अनेक राज्यांमध्ये वेगवेगळी मार्गदर्शक तत्त्वे जारी करण्यात आली आहेत. लॉकडाऊन, संचारबंदी तर कडक निर्बंध लादण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत ऑटोमोबाईल कंपनीचा हा निर्णय ग्राहकांसाठी दिलासा देणारा आहे.

महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीने आपल्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी वाढवित आहेत. देशात कोरोनाच्या दुसर्‍या लाटेने थैमान घातले आहे. याच पार्श्वभूमीवर कंपनीने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. ज्या ग्राहकांच्या वाहनांची वॉरंटी 1 एप्रिल ते 31 मे दरम्यान संपणार आहे.

ती मुदत आता 30 जून 2021 पर्यंत वाढवण्यात आली आहे. तसेच महिंद्राने वॉरंटी पीरियड एक्सटेंशन आणि शेड्यूल मेंटेनन्स तसेच फ्री सर्व्हिसिंगची सुविधा सर्व गाड्यांवर देऊ केली आहे. ज्यामध्ये थार, एस यू व्ही, बलेरो, स्कॉर्पिओ, एक्स यु व्ही 300 या गाड्यांचा समावेश आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com