धानाच्या भरडाईकरिता २४४ कोटींचे विशेष अनुदान मंजूर

धानाच्या भरडाईकरिता २४४ कोटींचे विशेष अनुदान मंजूर

नाशिक । Nashik

करोना महामारीची स्थिती लक्षात घेऊन तसेच अवकाळी पावसामुळे धानाची नासाडी होऊ नये म्हणून एकवेळची विशेष बाब म्हणून धानाच्या भरडाईकरिता अनुदान मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला. एकूण २४४ कोटी रुपये इतक्या रकमेच्या खर्चास मान्यता देण्यात आली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

पणन हंगाम २०१९-२० मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेखाली विकेंद्रित खरेदी योजनेंतर्गत केलेल्या धानाच्या भरडाईसाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रति क्विंटल दहा रुपये भरडाई दरात राज्य शासनाकडून आणखी ३० रुपये प्रति क्विंटल इतका वाढीव भरडाईदर मंजूर करुन भरडाईचा एकूण दर चाळिस रुपये प्रति क्विंटल निर्धारित करण्यात आला. त्याकरिता एकूण रुपये ५२. २कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली.

पणन हंगाम २०२०- २१ मधील आधारभूत किंमत खरेदी योजनेखाली विकेंद्रित खरेदी योजनेंतर्गत केलेल्या धानाच्या भरडाईसाठी केंद्र शासनाने मंजूर केलेल्या प्रति क्विंटल दहा रुपये या भरडाई दरात राज्य शासनाकडून आणखी चाळिस रुपये प्रति क्विंटल इतका वाढीव भरडाईदर मंजूर करुन भरडाईचा एकूण दर पन्नास रुपये प्रति क्विंटल निर्धारित करण्यास मंजुरी देण्यात आली. त्याकरिता एकूण ५४ कोटी ८० लाख कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली.

पणन हंगाम २०२० -२१ मध्ये धान भरडाई होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर, खरेदी करण्यात आलेल्या धानाच्या तातडीने भरडाईकरिता कोरोना संकट व अवकाळी पाऊस तसेच गारपीट या पार्श्वभूमीवर एकवेळची विशेष बाब शंभर रुपये प्रतिक्विंटल विशेष भरडाई अनुदान म्हणून राज्य शासनाकडून मंजुरी देण्यात आली. त्याकरिता एकूण १३७ कोटी इतक्या अंदाजित खर्चास मान्यता देण्यात आली.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com