रक्षाबंधननिमित्त टपाल खात्याद्वारे विशेष पाकिटे

रक्षाबंधननिमित्त टपाल खात्याद्वारे विशेष पाकिटे

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

टपाल खात्याद्वारे (Postal Department) रक्षाबंधन (Rakshabandhan) निमित्त विशेष पाकिटे (Special Envelope) तयार करण्यात आली आहेत.

या पाकिटांद्वारे बहिणी (sister) आपल्या भावांना (brother) राखी पाठवू शकतील. भाऊ-बहिणीचे अतूट नाते कायम ठेवण्यासाठी, ग्राहकांसोबत तितकेच अतूट नाते असणार्‍या टपाल खात्याद्वारे निर्मित या विशेष राखीच्या पाकिटांमधून स्पीड पोस्टद्वारे (Speed ​​post) राखी (Rakhi) पाठवण्याची व्यवस्था केली गेली आहे.

दि. 11 ऑगस्ट या दिवशी राखी पौर्णिमा (Rakshabandhan) आहे. या विशेष पाकिटावर पाच रुपयांचे मुद्रित तिकीट आहे. ज्याची किंमत केवळ दहा रुपये इतकी आहे. आजच्या डिजिटल शुभेच्छांच्या (Digital Greetings) युगामध्ये पोस्टाद्वारे प्रत्यक्ष रूपाने राखीच्या माध्यमातून भावंडांना बहिणींचे प्रेम प्राप्त होत आहे.

हे अधिक महत्त्वाचे आहे. भावासाठी अतिशय प्रेमाने घेतलेली व त्याच प्रेमाने व स्नेहासहित टपाल खात्याच्या या विशेष पाकिटाद्वारे (Special Envelope) पाठविलेल्या राखीचा आनंद अवर्णनीय आहे. प्रत्येक भावापर्यंत आपल्या बहिणीची राखी वेळेत पोहोचावी यासाठी टपाल खात्याने (Postal Department) विशेष योजना आखली आहे.

नाशिक विभागाचे प्रवर अधीक्षक मोहन शंकर अहिरराव (Superintendent of Nashik Division Mohan Shankar Ahirrao) यांनी सांगितले की आमचे ग्राहक स्पीड पोस्टद्वारे (Customer Speed ​​Post) राखी पाठवू शकता आणि आता परदेशात देखील राखी वेळेवर पोहोचविली जाईल. या पाकिटांवर राखी या शब्दाचा उल्लेख केला असल्याने इतर टपालांमधून त्यांचे वर्गीकरण करणे सोपे झाले आहे.

याच सोबत सर्व टपाल कार्यालयांना सूचना देण्यात आली आहे की राखीचे टपाल शीघ्रतेने वितरित करावे.टपाल विभागातर्फे (Department of Posts) नाशिक जिल्ह्यातील (nashik district) (शहर व ग्रामीण) नागरिकांना या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com