पर्यावरण दिनानिमित्त मनपातर्फे विशेष स्वच्छता उपक्रम

नदी स्वच्छतेसह प्लास्टिक कचरा संकलन मोहीम
पर्यावरण दिनानिमित्त मनपातर्फे विशेष स्वच्छता उपक्रम

नाशिक | प्रतिनिधी

वाढते प्रदूषण (Pollution) व प्लास्टिकचा कचरा यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असून प्लास्टिक कचर्‍याचे (Plastic waste) विघटन होत नसल्याने प्लास्टिक एक जागतिक समस्या निर्माण झाली आहे. प्लास्टिकचा कमीत कमी वापर करणे किंवा प्लास्टिक वापरणे पूर्णपणे बंद करणे हि काळाची गरज बनली आहे. त्याचबरोबरीने वाढते नदी प्रदूषण देखील चिंतेचे कारण बनत असून या सर्व घटकांचा नागरिकांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत आहे. त्यामुळे प्रदुषण रोखण्याच्या अनुषंगाने विशेष स्वच्छता मोहीम (Cleanliness campaign) राबविण्यात आली....

पर्यावरण दिनानिमित्त (Environment Day) नाशिक महानगरपालिका (Nashik NMC) व शहरातील स्वयंसेवी संस्था,जेसीआय ग्रेपसिटी व पु.ना.गाडगीळ अँड सन्स यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमांतर्गत शहरातील तपोवन परिसरातील गोदावरी नदीच्या किनारी विशेष स्वच्छता मोहीम आणि प्लास्टिक संकलन मोहीम राबविण्यात आली. यावेळी सर्व उपस्थितांना स्वच्छतेची व पर्यावरण रक्षणाची शपथ देण्यात आली.

विशेष उपक्रमाच्या अनुषंगाने गोदावरी नदी (Godavari River) किनारी असणारा कचरा विशेषतः पर्यटकांनी फेकलेल्या प्लास्टिक बॉटल्स व इतर प्लास्टिक कचरा तसेच नदीपात्रात वाहून आलेला व साठून राहिलेला कचरा जमा करण्यात आला. या मोहीमेत सुमारे २५० ते ३००किलो कचरा जमा करण्यात येऊन मनपाच्या घंटागाडीद्वारे खत प्रकल्प येथे पाठविण्यात आला.

दरम्यान, यावेळी मनपा घनकचरा व्यवस्थापन विभाग संचालक डॉ. कल्पना कुटे, उपायुक्त तथा गोदावरी संवर्धन कक्ष प्रमुख डॉ. विजयकुमार मुंडे, जेसीआय ग्रेपसिटीचे महेश दीक्षित, सुनील रोकडे, पु. ना. गाडगीळ अँड सन्स यांचे अधिकारी व कर्मचारी तसेच मनपाचे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी आणि वॉटरग्रेस सफाई कर्मचारी उपस्थित होते.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com