केदा आहेर (अध्यक्ष, जिल्हा बँक)
केदा आहेर (अध्यक्ष, जिल्हा बँक)
नाशिक

जिल्हा बँकेची कर्ज वाटपाकरीता विशेष मोहीम

अध्यक्ष केदा पवार यांची माहिती

Gokul Pawar

Gokul Pawar

नाशिक । Nashik

जिल्हा बँकेकडे नियमित कर्ज परतफेड करण्याऱ्या व पात्र शेतकऱ्याना पुरेशा निधी अभावी मागील काळात कर्जवाटप करता आलेले नाही. त्या पात्र शेतकरी सभासदांना कर्ज वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिली.

नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची पीककर्ज आढावा बैठक शनिवार (दि.25) रोजी झाली. राज्य शासनाने महात्मा ज्योतीराव फुले कर्जमुक्ती योजनेतून बँकेला निधी प्राप्त झाला आहे. ही रक्कम जिल्हा बँकेच्या एक लाख ३ हजार थकबाकीदार शेतकऱ्यांच्या कर्जखात्यात जमा केली आहे. शासनाने जिल्हा बँकेला खरीप पीककर्ज वाटपासाठी ४३७ कोटी रुपयांचा लक्षांक दिला असून, त्यानुसार बँकेने खरीप पीककर्ज वाटपास सुरुवात केली आहे.

जे शेतकरी सभासद पीककर्जासाठी पात्र आहेत.त्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीत संपर्क साधावा व आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करण्याचे आवाहन बँकेतर्फे करण्यात आले आहे. तसेच जिल्हा बँकेकडे नियमित कर्ज परतफेड करण्याऱ्या व पात्र शेतकऱ्याना पुरेशा निधी अभावी मागील काळात कर्जवाटप करता आलेले नाही. त्या पात्र शेतकरी सभासदांना कर्ज वितरण करण्याचे आदेश जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी दिले आहेत.

बँकेला महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेच्या माध्यमातून निधी प्राप्त झाले असून खरीप कर्ज वाटपाला गती येत आहे.राज्य सरकारने सांगितल्याप्रमाणे पीककर्जासाठी पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना कर्ज देण्यासाठी बँकेनी नियोजन सुरु केले आहे. आजपर्यंत जिल्हा बँकेने १३५ कोटी रुपयांचे कर्ज वाटप केले असून बँकेस खरीप पिककर्जासाठी शासनाने ठरवून दिलेला लक्षाक बँक पूर्ण करणार आहे. तरी पात्र शेतकरी सभासदांनी सबधीत विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत आवश्यक त्या कागदपत्रांची पुर्तता करण्याचे आवाहन जिल्हा बँकेचे अध्यक्ष केदा आहेर यांनी केले आहे.

त्याचप्रमाणे सर्व प्रकारची जुनी थकबाकी वसुलीसाठी बँकेने नवीन सामोपचार कर्ज परतफेड योजना २०२० जाहीर केली असून सदर योजनेत थकबाकीदारांसाठी भरघोस सवलत देऊ केलेली असल्याने जास्तीत जास्त थकबाकीदारांनी सदर योजनेचा लाभ घेऊन बँकेस सहकार्य करण्याचे आवाहन बँकेचे अध्यक्ष यांनी केले आहे. या योजनेतून प्राप्त होणारी वसुलीची रक्कम देखील बँक कर्जवाटपासाठी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पात्र कर्जदारांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी बँकेच्या विभागीय अधीकारी यांच्या अध्यक्षतेखाली तालुकानिहाय कर्मचार्यांनची नियुक्ती केली आहे. कर्ज वाटपास पात्र व नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याना कर्ज उपलब्ध करुन दिले जाईल.

-केदा आहेर, अध्यक्ष (जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, नाशिक)

Deshdoot
www.deshdoot.com