कृषी सन्मान योजना लाभार्थ्यांसाठी विशेष मोहीम

कृषी सन्मान योजना लाभार्थ्यांसाठी विशेष मोहीम

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यातील कृषी सन्मान योजनेच्या ( Krushi Sanman Yojana ) लाभार्थ्यांसाठी आधार सक्षम पेमेंट सिस्टम (Aadhaar enabled payment system)सेवेद्वारे कोणत्याही बँकेचे पैसे डाक सेवक किंवा जवळ असलेल्या टपाल कार्यालयातून ( Post Office ) काढण्यासाठी 13 जूनपर्यंत विशेष मोहीम राबविण्यात येत असल्याचे, नाशिक विभाग प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी कळविले आहे.

इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक (India Post Payments Bank)ही भारत सरकारने टपाल विभागामार्फत सुरू केलेली बँकिंग सेवा आहे. या सेवेच्या माध्यमातून नागरिकांना धन हस्तांतरण (मनी ट्रान्सफर), थेट लाभ हस्तांतरण, देयक भरणा, आरटीजीएस तसेच बँक खाते आधारशी जोडले असेल तर जवळच्या आधार सक्षम पेमेंट सिस्टम सेवेच्या माध्यमातून कोणत्याही बँकेचे पैसे पोस्टमन, डाक सेवक अथवा आपल्या जवळ असलेल्या टपालकार्यालय कार्यालयातून काढता येणार आहे.

ग्राहकांना या सेवेचा लाभ घेता यावा, यासाठी जिल्हा टपाल कार्यालयामार्फत 30 मे ते 13 जून या कालावधीत मोहीम राबविण्यात येत आहे. इंडिया पोस्ट पेमेंट बँक ही लोकाभिमुख बँक आहे. कृषि सन्मान योजनेचे कोणत्याही बँकेचे पैसे पोस्ट ऑफिसमधून लाभार्थ्यांना काढता येणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी नाशिक विभागातील सर्व लाभार्थ्यांनी जवळच्या टपाल कार्यालय अथवा आपल्या पोस्टमन यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रवर डाक अधीक्षक मोहन अहिरराव यांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com