जात पडताळणी अर्जांसाठी विशेष मोहिम

News Update | न्यूज अपडेट
News Update | न्यूज अपडेटNews Update | न्यूज अपडेट

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्हा जात पडताळणी समिती (Caste Verification Committee) नाशिक येथे जात प्रमाणपत्र पडताळणीचे प्रकरणे त्रुटी पूर्तते अभावी प्रलंबित आहेत. त्याअनुषंगाने जात पडताळणीच्या त्रुटीयुक्त अर्जाचा निपटारा करण्यासाठी दि.28 व 29 मार्च या कालावधीत विशेष मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती उपायुक्त तथा नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे सदस्य राकेश पाटील यांनी दिली.

जिल्हा जात पडताळणी (Caste Validity) समिती मार्फत अर्जदारांनी नोंदणी केलेल्या ई मेलवर CCVIS - II प्रणालीद्वारे संबंधित अर्जदारांना त्रुटी कळविण्यात आल्या आहेत. त्यांची पूर्तता अद्यापपर्यंत ज्या अर्जदारांनी केलेली नसून त्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत, अशा अर्जदारांनी त्रुटीसह व मूळ कागदपत्रांसह 28 व 29 मार्च 2023 रोजी दुपारी 2 ते 4 यावेळेत समिती कार्यालयाच्या सुनावणी कक्षात उपस्थित रहावे.

News Update | न्यूज अपडेट
शिंदे गटातील सर्व परत येतील, मात्र एकनाथ शिंदेंना..; संजय राऊतांचा नाशकात मोठा दावा

ज्या अर्जदारांकडून वर नमूद कालावधीत त्रुटींची पूर्तता न झाल्यास त्यांच्या प्रकरणांवर नियमानुसार कार्यवाही करण्यात येईल. राज्य सामाईक प्रवेश प्रक्रिया अंतर्गत विविध व्यवसायिक अभ्यासक्रमास आरक्षित जागेवर 2023-24 या शैक्षणिक वर्षात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या मागासवर्गीय (Backward class) विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे ज्या विद्यार्थ्यांनी अद्याप पर्यंत त्यांचे अर्ज जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी जात वैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केलेले नाहीत,

News Update | न्यूज अपडेट
आशा सेविकांना दिवाळीचा बोनस देण्याबाबत शासन सकारात्मक

अशा विद्यार्थ्यांनी https://bartievalidity.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर मूळ कागदपत्र अपलोड करून ऑनलाईन अर्ज करावा. तसेच ऑनलाईन अर्ज, शपथपत्र व अपलोड केलेल्या मूळ कागदपत्रांच्या सत्यप्रती नाशिक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती च्या नागरी सुविधा (Civil facilities) केंद्र येथे कार्यालयीन वेळेत जमा करावेत, असेही पाटील यांनी कळविले आहे.

व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा...

अर्जदारांनी अर्ज भरताना स्वतःचा ई मेल व मोबाईल क्रमांकाद्वारेच अर्ज नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याचप्रमाणे समितीचा निर्णय किंवा जात वैधता प्रमाणपत्र हे अर्जदाराने नोंदणी केलेल्या ई-मेल वर पाठवत असल्याने अर्जदारांनी आपला युझर आयडी व पासवर्ड (User ID and Password) जतन करून ठेवावे, असे आवाहन देखील उपायुक्त तथा जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती चे सदस्य राकेश पाटील यांनी केले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com