आदर्श समाज घडविण्याचे कार्य वक्त्यांनी करावे : डॉ. भारद्वाज

आदर्श समाज घडविण्याचे कार्य वक्त्यांनी करावे : डॉ. भारद्वाज

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

वक्त्यांचे वक्तृत्व (Oratory) हे भविष्याचा वेध घेणारे असावे व त्यांनी अधिक सृजनशील बनावे. एक आदर्श समाज घडविण्याचे काम वक्त्यांनी करायला हवे, असे प्रतिपादन डॉ. अश्विनीकुमार भारद्वाज (Dr. Ashwinikumar Bhardwaj) यांनी केले...

विचारक्रांती वाचनालयाने (Vicharkranti Library) आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत ते बोलत होते. प्रमुख पाहुणे म्हणून सोशल नेटवर्किंग फोरमचे संस्थापक प्रमोद गायकवाड (Pramod Gaikwad), संजय कलंत्री, राजेंद्र पवार, भावना ठक्कर, जाखोरीच्या सरपंच मंगला जागळे, राम खैरनार उपस्थित होते.

स्पर्धेचे हे पाचवे वर्ष होते. स्पर्धेसाठी (Competiton) राज्याच्या विविध भागांतून एकूण ४० स्पर्धक सहभागी झाले होते. सातारा येथील सुजित काळंगे याने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक मिळवले. तर व्दितीय क्रमांकाचे पारितोषिक परभणीचे मंदार लटपटे, तृतीय बक्षीस कोल्हापूर येथील अक्षय इळके, चतुर्थ बक्षिस यवतमाळ येथील प्रतीक्षा गुरनुले यांनी पटकावले. उत्तेजनार्थ बक्षिसे-प्रसाद जगताप अहिरे (धुळे), तेजस पाटील (पुणे), आशुतोष निकम (सातारा), यश पाटील (कल्याण), श्रुती बोरस्ते (नाशिक) यांना मिळाले.

समारोपाप्रसंगी लेखक विष्णुपंत गायखे, अनिस सैय्यद, प्रेस कामगार नेते संतोष कटाळे, रमेश भाऊ खाडे, उपसरपंच प्रकाश पगारे, ग्रामसेवक श्याम गवळी उपस्थित होते. सूत्रसंचालन निकिता कातकाडे व आकाश तोटे यांनी केले. स्पर्धेचे परीक्षण प्रा. डॉ. पांडुरंग कंद, प्रा. कोमल जगझाप यांनी केले.

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी वाचनालयाचे अध्यक्ष सुहास खाडे, सचिव देविदास राजपूत, उपाध्यक्ष किशोर कळमकर, संचालक कैलास काशिनाथ धात्रक, संचालक विवेक कळमकर, पंकज खाडे, युवा कृषी उद्योजक विश्वास कळमकर, कोंडाजी ताजणे, सचिन ताजणे, दिनेश क्षीरसागर, शिवम आहेर, अनुप कळमकर, कैलास धात्रक आदींनी परिश्रम घेतले.

Related Stories

No stories found.