शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ; पोलीस अधीक्षकांनी घेतली भऊर ग्रामस्थांची भेट

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ; पोलीस अधीक्षकांनी घेतली भऊर ग्रामस्थांची भेट

भऊर । Bhaur

बँक ऑफ महाराष्ट्र (Bank of Maharashtra) शाखा भऊर (bhaur) येथील अपहार (embezzlement) प्रकरणातील फसवणूक (Fraud) झालेल्या खातेदारांची (Account Holders) भऊर येथे आज (दि.२३) पोलीस अधीक्षक (Superintendent of Police) सचिन पाटील (Sachin Patil) यांनी भेट घेत संबंधित खातेदारांच्या समस्या जाणून घेतल्या. यावेळी बँक अपहार प्रकरणातील खातेदारांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न केले जातील असे आश्वासन पाटील यांनी दिले...

महाराष्ट्र बँक घोटाळ्यातील आतापर्यंत पन्नास खातेदारांची फसवणूक झाल्याचे निदर्शनास आले असून २ कोटी १० लाख ८० हजार रुपयांचा घोटाळा (Scam) प्रथम दर्शनी निदर्शनास आला आहे. तसेच याप्रकरणी आत्तापर्यंत पाच जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच अपहार प्रकरणाची व्याप्ती पाहता नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी आज भऊर येथे संबंधित खातेदारांची भेट घेतली.

तसेच फसवणूक झालेल्या खातेदारांनी जी यादी बँकेच्या माध्यमातून पोलिसांना (Police) प्राप्त झालेली आहे ती यादी ग्रामपंचायत स्तरावर प्रसिद्ध करण्याचे आदेश यावेळी त्यांनी दिले. तर संबंधित खातेदारांनी यादी तपासून यात काही शंका असल्यास लेखी अर्जासह देवळा (Deola) पोलिसांशी संपर्क साधण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक पाटील यांनी केले आहे.

दरम्यान, याप्रकरणी सन २०१६ पासून आजतागायतच्या अधिकाऱ्यांना चौकशीसाठी बोलाविण्यात येणार आहे. तसेच पुढील आठवड्यात बँकेचे वरिष्ठ अधिकारी, फसवणूक झालेले खातेदार यांची संयुक्त बैठक घेणार असल्याचे देखील पोलीस अधीक्षक पाटील यांनी सांगितले. यावेळी देवळा पोलीस निरीक्षक (Police Inspector) दिलीप लांडगे (Dilip Landge) उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com