सोयाबीनला मिळाला प्रतिक्विंटल 'इतका' भाव

सोयाबीनला मिळाला प्रतिक्विंटल 'इतका'  भाव

पालखेड मिरचीचे । वार्ताहर Palkhed Mirchiche

पालखेड उपबाजार (Palkhed sub market)आवारात भुसार शेतमाल लिलावाच्या शुभारंभप्रसंगी 79 क्विंटल सोयाबीन तर 1 क्विंटल हरभरा आवक झाली. सोयाबीनला 4500 तर जास्तीत जास्त 5531 आणि सरासरी 5301 रु. भाव मिळाला, तर हरभर्‍यालादेखील 5051 रु. प्रतिक्विंटल भाव मिळाला.

बाजार समितीत काम करत असताना शेतकरीवर्ग केंद्रस्थानी मानून काम केले. तसेच शेतकर्‍यांना सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या. रोख चुकवतीमुळे शेतमाल आवक वाढत आहे. शेतकर्‍यांनी आपला माल प्रतवारी करून आणल्यास जास्तीत जास्त भाव देणे सुलभ होईल, असे प्रतिपादन पिंपळगाव कृउबा समिती सभापती आ. दिलीप बनकर यांनी केले.

दसर्‍याच्या मुहूर्तावर पिंपळगाव बाजार समितीच्या पालखेड उपबाजार आवारावर भुसार शेतमाल लिलावाचा शुभारंभ आ. बनकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी नारायणगाव (ता.चांदवड) येथील किरण देवराम मांदोले यांच्या सोयाबीनला 5301 रुपये बाजारभाव मिळाला. याप्रसंगी बाजार समिती उपसभापती दीपक बोरस्ते, संचालक निवृत्ती धनवटे, रामभाऊ माळोदे, सुरेश खोडे, सोहनलाल भंडारी, नारायण पोटे, शरद काळे आदींसह शेतकरी उपस्थित होते. पालखेड येथे भुसार माल व द्राक्षमण्यांंचे लिलाव सुरू करून शेतकर्‍यांचा वेळ व पैशांची बचत झाली आहे.

व्यापारी वर्गालादेखील चांगल्या दर्जाचा माल या उपबाजार आवारात उपलब्ध होत असल्याने बाजारभाव अधिक असतात, असेही बनकर म्हणाले. याप्रसंगी निवृत्ती थेटे, बाळासाहेब थेटे, माधव ढोमसे, भाऊसाहेब मेधने, रमेश शिंदे, अशोक आहेर, भाऊसाहेब थेटे, बाबासाहेब शिंदे, शरद आहेर, मनोहर थेटे, धर्मिजी गिते, इम्तियाज शेख, श्रीधर जाधव, बाबाजी आहेर, ज्ञानेश्वर जाधव, संजय शिंदे, बळवंत जाधव, संपत दौड, सरपंच रवींद्र कोकाटे, पोपट चौधरी, केशव शिंदे, नारायण ढोमसे, विजय ढोमसे, बंडू चव्हाण, व्यापारी मंगेश छाजेड, साहेबराव काळे, बाजीराव हिरे, पंकज बोथरा, परसराम शर्मा, अनिल बाफणा, साखरचंद गंगवाल, बाजार समिती सचिव संजय लोंढे, पालखेड कार्यालयाचे निरीक्षक सदाशिव थेटे आदींसह पालखेड परिसरातील शेतकरी, बाजार समिती कर्मचारी, व्यापारी, हमाल, माथाडी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com