नाशिक विभागात ५३ टक्के क्षेत्रावर पेरणी

तर राज्यात ७० टक्के पेरणी, अद्यापही पावसाची प्रतीक्षा
नाशिक विभागात ५३ टक्के क्षेत्रावर पेरणी

नाशिक | Nashik

नाशिक विभागात (Nashik Division) 21.19 लाख हेक्टर खरीपाचे क्षेत्र (Kharip Land) असून त्यापैकी 11.26 लाख हेक्टर (53.12 टक्के) क्षेत्रावर पेरणी (Kharip Sowing) झाली आहे.

राज्यात नैऋत्य मान्सूनचा पाऊस (Mansoon Rain) दाखल झाल्याने कालपर्यंत खरिपाच्या 151.33 लाख हेक्टर क्षेत्रापैकी 105.96 लाख हेक्टर क्षेत्रावर जवळपास 70 टक्के पेरणी झाली असून अद्याप काही भागात पुरेशा पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा (Waiting For Rain) आहे.

पीकपेरणी व पीकवाढीसाठी पावसाची आवश्यकता असून हंगामात शेतकऱ्यांना खताची कमतरता (Fertilizer Availability) जाणवणार नाही याचे नियोजन करण्यात आल्याचे कृषीमंत्री दादाजी भुसे (Minister Dada Bhuse) यांनी सांगितले.

राज्यात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची नोंद (Rainfall In State) झाली असून कोकण विभागात (Heavy Rainfall In Kokan Division) मुसळधार पाऊस होत आहे.

औरंगाबाद(Aurangabad), लातूर (Latur), अमरावती (Amravati) व नागपूर विभागात बहुतांश ठिकाणी हलक्या ते मध्यम तर तुरळक ठिकाणी जोरदार स्वरुपाचा पाऊस झाला आहे. पुणे व कोल्हापूर विभागात बहुतांश ठिकाणी नाशिक विभागात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची नोंद झाली आहे. 12 जुलैपर्यंत राज्यात 368 मिमी. पाऊस झाला आहे.

राज्यात ऊस पिकासह (Sugarcane Crop) खरिपाचे क्षेत्र 151.33 लाख हेक्टर आहे. गेल्या आठवड्यापासून पर्जन्यमानास सुरुवात झाल्याने पेरणीची खोळंबलेली कामे सुरु झाली आहे. काही ठिकाणी पेरणी झालेली ज्वारी, बाजरी, मका, भुईमूग, सुर्यफूल, सोयाबीन, कापूस, तूर, मुग, उडीद, तीळ व कारळे ही पिके उगवण ते वाढीच्या अवस्थेत आहे, असे कृषीमंत्र्यांनी सांगितले.

राज्यात अद्यापही काही भागात समाधानकारक पावसाची प्रतीक्षा असून खरिपाशी निगडीत कामांबाबत कृषी विभाग लक्ष ठेवून आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना मार्गदर्शक सूचनादेखील देण्यात येत असल्याचे डवले यांनी सांगितले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com