तू ये रे पावसा, तू येरे पावसा ..!

..नाहीतर दीड लाख हेक्टरवरील पेरण्या धोक्यात
तू ये रे पावसा, तू येरे पावसा ..!
पेरणी प्रात्यक्षिक

नाशिक । Nashik

जून महिन्यात (June) पावसाने दडी मारल्याने शेतकरी वर्गाला पावसाने चिंतेत टाकले आहे. नाशिक जिल्हयातील (Nashik District) शेतकऱ्यांनी कमी पावसावर पेरणी (Kharip Sowing) केल्याने आणि त्यातच पावसाने सलग दांडी मारली आहे. पुढील काही दिवसात जिल्हयातील जवळपास दीड लाख हेक्टरवरील (One and a half lakh hectares) पेरण्या धोक्यात (Sowing in danger) येण्याची शक्यता आहे. नाशिक जिल्हयात आतापर्यत १ लाख ८२ हजार९१० हेक्टरवर पेरणी झाली आहे.

नाशिक जिल्हयात ६ लाख ६५ हजार ५८२ सर्वसाधारणक्षेत्रापैकी १ लाख ८२ हजार९१० हेक्टरवर पेरणी झाली आहे. यात पेरणीची ट्क्केवारी २७ ट्क्केवर पोचली आहे. पाउस पडल्यावरच पेरणी करण्याचे आवाहन कृषी विभागाने (Agriculture Department) शेतकऱ्यांना केले होते.

या आवाहानाला जिल्हयातील बहूतेक शेतकऱ्यांनी प्रतिसाद (Farmers Responce) दिल्याचे दिसून आले. मात्र ज्या भागात थोड्या प्रमाणात पाउस पडला तेथील शेतकऱ्यांनी मका (maize), बाजरी, मुग या पिकांची पेरणी करुन टाकली. पुढे मात्र पावसाने दांडी दिल्याने शेतकरी वर्गासमोर संकट उभे राहिले आहे. विभागात आतापर्यत ४६ टक्क्यांवर पेरणी झाली असून ९ लाख ८४ हजार ७२१ हेक्टरचा यात समावेश आहे. दरम्यान जुलै महिना लागून आठवडा होत आहे.

अद्यापही पावसाने पाठ फिरविल्याने शेतकरी वर्गाच्या आकाशाकडे नजरा लागल्या आहेत. हवामान विभागाने पुढील तीन चार दिवसात पावसाची शक्यता वर्तविली असली तरी हा अंदाज कितपत खरा ठरेल. याची शेतकरी वर्गामध्ये चर्चा आहे. पुढ्च्या काही दिवसात पाउस लांबणीवर गेल्यास जिल्हयातील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. काही शेतकऱ्यांची पेरणी वाया गेल्याने त्यांंच्यासमोर दुबार पेरणीशिवाय पर्याय नाहीये.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com