जिल्ह्यात रब्बीची फक्त 'इतके' टक्के पेरणी

जिल्ह्यात रब्बीची फक्त 'इतके' टक्के पेरणी

नाशिक । प्रतिनिधी | Nashik

जिल्ह्यात यावर्षी काही भागात झालेली अतिवृष्टी (heavy rain), लांबलेला पाऊस याचा फटका खरीप हंगामाला (kharif season) बसला. यामुळे खरीप पिकांच्या (kharif crop) सोंगणी व मळणीच्या कामाला वेळ लागला.

यामुळे रब्बी हंगामातीळ (rabbi season) गहू (wheat), हरभरा (gram), ज्वारी (sorghum) आदी पिकांच्या पेरणीला व रब्बी कांदा (onion) लागवडीला म्हणावा तसा वेग आलेला नाही. त्यामुळे डिसेंबर महिना सुरू झाला तरी अवघ्या १७.१८ टक्के रब्बीची पेरणी झालेली आहे. जिल्ह्यात साधारणपणे १५ डिसेंबरपर्यंत रब्बीच्या पेरण्या पूर्ण होतात. मात्र, चालू हंगाम याला अपवाद ठरला आहे.

यावर्षी रब्बी हंगाम (rabbi season) सुरु झाला तरी पाऊस सुरु होता. यामुळे जिल्ह्यातील अनेक भागात खरिपाच्या पिकांची वेळेत सोंगणी करता आली नाही. जमीन अडकून असल्याने रब्बीच्या पेरण्यांना उशिराने सुरुवात झाली आहे. यामुळे अद्याप पेरणीला म्हणावा तसा वेग आलेला नाही. यापुढील काळात पेरणीत वाढ होईल, असे जिल्हा परिषदेच्या (zilha parishad) कृषी विभागातर्फे (Department of Agriculture) सांगण्यात आले.

जिल्ह्यात झालेली पिकनिहाय पेरणी

  • ज्वारी : ८५९.४५ हेक्टर

  • गहू : ९.१५०.२ हेक्टर

  • मका : १.३९२ हेक्टर

  • हरभरा : ८,१५५.८५ हेक्टर

  • ऊस : ८, ४५५.२५ हेक्टर

रब्बी हंगामात जिल्ह्यात गहू, हरभरा, ज्वारी या पिकांबरोबरच आता उन्हाळ मकाला ही प्राधान्य दिले जात आहे. आतापर्यंत पेरणी झालेल्या क्षेत्रात सर्वाधिक पेरणी गव्हाची झाली आहे तर ८,१५५ हेक्टर क्षेत्रावर हरभऱ्याची पेरणी झाली आहे. आतापर्यंत एकूण २०.१७३ हेक्टरपर्यंत अन्नधान्य क्षेत्रावरच या पिकांची पिकांची पेरणी झाली आहे.

जिल्ह्यात चार सहकारी साखर कारखाने सुरु झाल्यामुळे ऊस उत्पादकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे. त्यामुळे यावर्षी ऊस लागवडीचे क्षेत्र वाढण्याची शक्यता आहे. आतापर्यंत ८,४१३. २५ हेक्टर क्षेत्रावर उसाची नव्याने लागवड झाली आहे. गतवर्षी नोव्हेंबर अखेरपर्यंत ८,१४१.६० हेक्टरवर उसाची लागवड झाली होती.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com