भूमी अभिलेखची प्रकरणे मार्गी लावा : आ. खोसकर

भूमी अभिलेखची प्रकरणे मार्गी लावा : आ. खोसकर

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

इगतपुरी व त्र्यंबकेश्वर तालुक्यातील Igatpuri & Trimbakeshwar Taluka भूमी अभिलेख कार्यालय Land recordsयांच्याशी निगडीत शेतीची मोजणी, वहिवाट रस्ते मोजणी तसेच जमीन एकत्रिकरणाचे वेळी गट स्कीममधील महसुली चुका व त्यावरील प्रलंबित दावे हे अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत.

शेत वहिवाटीतील लगत कब्जेदाराचे अतिक्रमण, वहिवाटीसंबंधित वाद व 7/12 स्वतंत्र करणेकामी पोटहिस्सा मोजणी व हद्द कायम मोजणी आदी प्रकरणे अनेक दिवसांपासून प्रलंबित आहेत. शेतकर्‍यांची कामे सोयीस्करपणे सुरळीत व वेळेत व्हावीत यासाठी आ. हिरामण खोसकर व माजी जि. प. सदस्य गोरख बोडके यांनी भूमी अभिलेख जिल्हा अधीक्षक कुलकर्णी, उपसंचालक शिंदे यांच्या कार्यालयात जाऊन शेतकर्‍यांच्या व्यथा व समस्या मांडत चर्चा केली.

इगतपुरी तालुक्यातील मोजणीचे 900 प्रकरणे प्रलंबित असून हे काम लवकर मार्गी लावावे व तालुक्यातील इगतपुरी भूमी अभिलेख कार्यालय येथे मोजणीसाठी 20 कर्मचारी आणखी वाढवून देण्यात यावे, अशी मागणी आ. खोसकर MLA Khoskar यांनी यावेळी केली.

Related Stories

No stories found.