सातपूर येथे लवकरच ५० बेडचे करोना कक्ष

आयुक्त कैलास जाधव यांनि दिल्या सूचना
सातपूर येथे लवकरच ५० बेडचे करोना कक्ष

नाशिक । Nashik

सातपूर विभागातील ई.एस. आय.एस. या हॉस्पिटलची पाहणी करून त्या ठिकाणी लवकरच ५० बेडचे कोरोना कक्ष उभारण्याच्या दृष्टीने संबंधित विभागाला मा. आयुक्त कैलास जाधव यांनी सूचना दिल्या आहेत.

सातपूर विभागातील ई.एस. आय.एस.या हॉस्पिटलची पाहणी मा.आयुक्त कैलास जाधव यांनी केले. तसेच या ठिकाणी रुग्णांना दिली जाणारी सेवा तसेच संबंधित उपचार याबाबत माहिती येथील या हॉस्पिटलच्या डॉ. राजश्री पाटील यांच्याशी चर्चा करून घेतली. या ठिकाणी ५० बेडचे कोरोना कक्ष सुरू करण्याबाबत चर्चा झाली.

पुढील काही दिवसात त्या ठिकाणी कोरोना कक्ष उभारण्याच्या दृष्टीने संबंधित विभागास सूचना यावेळी मा.आयुक्त कैलास जाधव यांनी दिल्या तसेच या परिसरात असणाऱ्या मोकळ्या जागेची पाहणी देखील मा. आयुक्त कैलास जाधव यांनी केली.

सातपूर विभागीय कार्यालया अंतर्गत सुरू असलेल्या वॉर रूमची पाहणी करून तेथील कामकाजाची माहिती घेतली. त्या ठिकाणी कोणत्या स्वरूपाची माहिती विचारली जाते. येणाऱ्या फोनची संख्या, बेड बाबतची माहिती, रुग्णवाहिका, शववाहिका मागणी साठी किती फोन प्राप्त होतात. तसेच फोनचे स्वरूप याविषयी सविस्तर माहिती घेतली.या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या नोंदणी रजिस्टर पाहणी मा.आयुक्त कैलास जाधव यांनी केली.

यावेळी मा.आयुक्त कैलास जाधव यांच्या समवेत मा.विभागीय अधिकारी नितीन नेर,नोडल वैद्यकीय अधिकारी डॉ.बाजी, मायको हॉस्पिटलच्या डॉ.कोल्लूरे आदी उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com