जुने नाशकात दुकानांसह काही मार्ग खुले
नाशिक

जुने नाशकात दुकानांसह काही मार्ग खुले

Abhay Puntambekar

जुने नाशिक । प्रतिनिधी Nashik

करोनाला नियंत्रणात आणण्यासाठी महापालिका प्रशासनाने जुने नाशिक परिसराला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले होते. यानुसार मागील काही दिवसांपासून येथील मार्ग प्रशासनाने लोखंडी जाळ्या व बांबू लावून बंद केले होते. मात्र सध्या जुने नाशिक परिसरात करोना रुग्णांची संख्या अत्यंत कमी झाली असतानाही बंदी का, असा प्रश्न उपस्थित करून नागरिकांनी बंदला विरोध केला होता. दरम्यान जुने नाशिकच्या काही भागात दुकाने तसेच मार्ग खुली झाली आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

सारडा सर्कल वरून चौक मंडईकडे जाणार्‍या इमाम शाह बाबा रोड तसेच गंजमाळ येथून भद्रकाली पोलिस ठाणेकडे जाणार्‍या मार्गावरील अडथळे दूर करण्यात आल्याने नागरिक या मार्गांचा उपयोग करीत आहे. त्याचप्रमाणे काही हॉटेल तसेच दुकाने देखील सुरू झाली आहे. ठिकठिकाणी पोलिस बंदोबस्त तैनात असून कायदा भंग करणार्‍यांवर पोलिसांची कारवाई देखील सुरू आहे.

मात्र रस्ते बंद करण्यात आल्यामुळे हातावरचे कामगारांचे मोठे हाल झाले होते. विविध संस्था तसेच नागरिकांनी बंदला विरोध करून महापालिका प्रशासन तसेच पोलीस प्रशासनाला मार्ग खुले करण्याची मागणी देखील केली होती. मात्र आता मागील दोन-तीन दिवसांपासून मार्ग खुले झाल्याने परिसरातील वर्दळ वाढली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com