रेशन दुकानदारांच्या समस्या सोडवा

पालकमंत्र्यांनी दिल्या सूचना
रेशन दुकानदारांच्या समस्या सोडवा

नाशिक । प्रतिनिधी Nashik

राज्यातील रेशन दुकानदारांच्या ( Ration Shop )समस्यांची सोडवणूक अनेक दिवसांपासून होत नसून मागील काही दिवसांपासून पुन्हा रेशन वितरणाचे इ-पॉस मशीन ( E-Paus Machine )ठप्प झालेले आहे. त्यामुळे धान्याचे वितरण योग्य पद्धतीने करता येत नसल्याने दुकानदार आणि रेशनकार्डधारकांत वादविवाद होत आहेत.

याबाबतच्या विविध समस्या त्वरित सोडवाव्यात, अशी मागणी रेशन दुकानदार संघटनेने राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे केली. यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी अरविंद नरसीकर यांना या समस्या सोडवण्याचे आदेश दिले.

त्यावर भुजबळांनी जिल्हास्तरीय समस्यांबाबत पुरवठा अधिकार्‍यांना तर राज्यस्तरीय प्रश्नाबाबत पुरवठा सचिवांना सूचना दिल्या. पुरवठा अधिकार्‍यांनी सर्व तहसीलदारांना सूचना देत दुकानदारांसोबत बैठक घेत समस्याही जाणून घेतल्या. यावेळी आ. हिरामण खोसकर, राज्य अध्यक्ष गणपत डोळसे-पाटील, राज्य उपाध्यक्ष निवृत्ती कापसे, योगेश बत्तासे, सतीश भुतडा, संजय झगडे, भगवान जाधव, नवनाथ गडाख, गोरख काळे, अनिकेत झिटे, वैभव तुपे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.