समृध्दी पुलाखाली तुंबणाऱ्या पाण्याची समस्या सोडवा: आ. कोकाटे

समृध्दी पुलाखाली तुंबणाऱ्या पाण्याची समस्या सोडवा: आ. कोकाटे

वावी । वार्ताहर | Vavi

समृद्धी महामार्गाचे काम (Samruddhi Highway work) अंतिम टप्प्यात असून महामार्गावरील पुलांखालील साचलेल्या पाण्यामुळे अपघात (accidents) होण्याचे प्रमाण वाढत असून हे पाणी शेतातही शिरत आहे.

त्यामुळे काही शेतकर्‍यांनी (farmers) आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांच्याकडे तक्रार केल्याने आ. कोकाटे यांनी प्रत्यक्ष या पुलांची पाहणी करुन अधिकार्‍यांना धारेवर धरले. तात्काळ या पाण्याचा निर्णय घ्या अन्यथा महामार्गावर एक गाडी देखील चालू देणार नाही असे कोकाटे यांनी अधिकार्‍यांना सुनावले.

वावी परिसरातून सध्या दोन महामार्ग (Highway) जात असून त्यात समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात आहे. काम करत असताना यावर नियंत्रण ठेवणारे संबंधित अधिकार्‍यांनी पुलाची बांधणी करताना जमिनीच्या पातळीपेक्षा अधिक दोन-तीन फुटाचे खड्डे ठेवून पुलाची बांधणी केली आहे. त्यामुळे पावसाचे पाणी या पुलाखाली साचून तळे निर्माण होत आहे. याचा फटका स्थानिक रहिवाशांना होत आहे.

शाळेतील विद्यार्थ्यांना (students) पुला खालून कमीत कमी दोन फूट पाण्यातून ये-जा करावी लागत आहे. तसेच काही ठिकाणी दलदलीचे रुप निर्माण झाले आहे. त्यामुळे पुलाखाली अपघाताचे प्रमाण वाढले असून ग्रामस्थांनी समृद्धी व पीडब्ल्यूडीच्या (PWD) अधिकार्‍यांना सूचना देऊन देखील कुठलीही कार्यवाही होताना दिसून येत नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी आ. कोकाटे यांच्याकडे धाव घेत त्यांना प्रत्यक्ष पाहणी करावी अशी मागणी केल्यानंतर आ. कोकाटे संबंधित फुलांची पाहणी केली.

या पुलावर नियंत्रण ठेवणारे शासनाचे अधिकारी व समृद्धी महामार्गाचे अधिकार्‍यांची झाडाझडती करत त्यानां धारेवर धरल्याचे बघायला मिळाले. हा प्रश्न वेळीच मार्गी न लागल्यास या महामार्गावर एकही गाडी चालू देणार नाही असे परखड वक्तव्यात त्यांनी अधिकार्‍यांना सुनावले. यावेळी जिल्हा परिषदेच्या माजी सदस्य सीमंतिनी कोकाटे (Former Zilha Parishad member Seemantini Kokate),

वावीचे माजी सरपंच विजय काटे, कन्हैयालाल भुतडा, रामनाथ कर्पे, ग्रामपंचायत सदस्य संदीप राजेभोसले, सचिन वेलजाळी, विजय सोमाणी, नामदेव वेलजाळी, रामभाऊ ताजणे, सुधाकर ताजणे, अशोक ताजणे, विठ्ठल उगले, नंदू गोराणे, सूर्यभान गोराणे, पवन भेंडाळे, पोलीस पाटील भाऊसाहेब खरात, लक्ष्मण नवले, अशोक घेगडमल, सुनील पवार यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

अनेक वेळा समृद्धी महामार्गाचे व संबंधित शासकीय अधिकारी यांना पुलाखाली साचणार्‍या पाण्याचा निचरा करावा याकरता विनंती केली व पत्रव्यवहारही केला. मात्र, जडबुद्धीचे अधिकारी यांना परिसरातील ये-जा करणार्‍या ग्रामस्थांची पर्वा नाही. या पाण्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे प्रमाणापेक्षा जास्त हाल होत आहे. आ. कोकाटे यांनी तात्काळ हा प्रश्न मार्गी लावावा.

- विजय काटे, माजी सरपंच, वावी

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com