मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा
नाशिक

मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावा

राज्यभर आंदोलनाचा इशारा

Ravindra Kedia

Ravindra Kedia

सातपूर | प्रतिनिधी Satpur

आरक्षणासहित मराठा समाजाचे सर्व प्रश्न त्वरीत मार्गी लावावेत अन्यथा राज्य सरकार विरोधात मराठा समाजाच्या वतीने राज्यभर मोठे आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा देणारे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले

मराठा आरक्षणाबाबत विविध मागण्यांचे निवेदनातील भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवण्याची विनंतीही जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली

या निवेदनानुसार मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायलयामध्ये सुनावणी सुरु आहे याप्रश्नी समाजातून आवाज उठवायला लागला तेंव्हा कुठे आपण आणि मंत्रीमंडळ उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी लक्ष घातले, दोन व्हिडीओ कॉन्फरन्स बैठका झाल्या.या बैठकीमध्ये मिळालेल्या शब्दांपेक्षा प्रत्यक्ष वेगळे घडत असल्याबद्दल. म्हणून मराठा समाजामध्ये आरक्षणांबाबत मोठी चिंता वाढत असल्याचेेे म्हटले आहे.

सरकारचे आमच्या प्रश्नांकडे लक्ष वेधून घ्यावे व आरक्षणाची शासनाने काळजी घ्यावी, मागील सरकारने उच्च न्यायालयामध्ये टिकवलेला आरक्षण आपल्या सरकारने सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकवावे म्हणून आम्ही आंदोलन करण्याचा निर्णय घेतला असल्याचे यात म्हटले आहे

आंदोलनाचा प्रथम टप्पा म्हणून निवेदनाद्वारे आपले लक्ष वेधण्यात येत आहे. आरक्षणासहित मराठा समाजाचे सर्व प्रश्न त्वरीत मार्गी लावावेत अन्यथा राज्य सरकार विरोधात मराठा समाजाच्या वतीने राज्यभर मोठेआंदोलन छेडण्यात येईल असा इशाराही निवेदनाद्वारे मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे

जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनाच्यावेळी करण गायकर, गणेश कदम, शरद तुंगार, विजय खर्जुल, मनोज दातीर, अनिल गोवर्धने, ज्ञानेश्वर भोसले, तुषार भोसले, गणेश ढिकले, भास्कर पवार, गणेश दळवी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com