<p>नाशिकरोड | Nashik </p><p>येथील आर्टिलरी सेंटर परिसरात असलेल्या न्यू मॅप एव्हीएन कॉटर्स आर्मी सेंटर मध्ये राहणाऱ्या लष्करी जवानाची पत्नी रुबी देवनाथ (३७) ही इमारतीवरून खाली पडल्याने गंभीर जखमी झाली. </p> .<p>त्यानंतर सदर महिलेला उपचारासाठी देवळाली कॅम्प येथील लष्करी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. परंतु उपचारादरम्यान तिचे निधन झाले.</p><p>सदर घटनेप्रकरणी उपनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.</p>