दावचवाडीच्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू
नाशिक

दावचवाडीच्या जवानाचा हृदयविकाराने मृत्यू

शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार

Abhay Puntambekar

पालखेड मिरचीचे। वार्ताहर; Pakhed Mirchi

१११ बटालियन छत्तीसगड या ठिकाणी केंद्रीय रिझर्व्ह पोलीस दलात सहायक पोलीस उपनिरीक्षक पदावर कार्यरत असलेले व दावचवाडी येथील राजाराम चिंधुबाबा कुयटे (५०) यांचे गुरुवारी रात्री ११.३० वाजता हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर दावचवाडी येथे उद्या शनिवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राजाराम कुयटे २५ वर्षांपूर्वी नागपूर येथे भारतीय सैन्य दलात दाखल झाले होते. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. घरात वृद्ध आई, वडील, एक बहीण, पत्नी, एक मुलगा (१८), मुलगी (२१) असा परिवार आहे.

कुयटे यांचे प्राथमिक शिक्षण दावचवाडी तर माध्यमिक शिक्षण रानवड येथे झाले. त्यांना लहानपणापासूनच देशसेवेची आवड होती. हृदयविकारामुळे त्यांचा मृत्यू झाल्याने परिसरावर शोककळा पसरली आहे.

Deshdoot
www.deshdoot.com