नायलॉन मांजाची विक्री भोवली;  तडीपारीची कारवाई

नायलॉन मांजाची विक्री भोवली; तडीपारीची कारवाई

नाशिक | प्रतिनिधी

नायलॉन मांजा Nylon Manja विक्री करणाऱ्या अंबड व नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील Ambad & Nashikroad दोन व्यक्तींना नाशिक शहर तसेच जिल्ह्यातून तडीपार Action of Deportionकरण्यात आले.

पोलीस आयुक्त दीपक पांडे Police Commissioner Deepak Pandey यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त परिमंडळ 2 विजय खरात यांनी अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सचिन लखीचंद समदडिया ( रा. औदुंबर स्टॉप, राणाप्रताप चौक, नवीन नाशिक ) व नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बाळासाहेब खंडेराव रहिंज रा. संत ज्ञानेश्वर नगर, जेलरोड, नाशिक रोड ) यांच्याविरोधात नायलॉन मांजा विक्री करताना आढळून आल्याने कारवाई करत 30 जानेवारी 2022 पर्यंत नाशिक शहर व जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेशित करण्यात आले.

उपायुक्त विजय खरात यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, आपल्या परिसरामध्ये कोणी नायलॉन मांजाचा वापर करीत असेल किंवा त्याची विक्री करत असेल तर स्थानिक पोलिस ठाण्याशी संपर्क साधावा त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com