सार्वजनिक प्रसाधन गृहांवर उभारणार सौरऊर्जा पॅनल

एक कोटी 82 लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी
सार्वजनिक प्रसाधन गृहांवर उभारणार सौरऊर्जा पॅनल

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील 113 सार्वजनिक शौचालयांवर सौरऊर्जा पॅनल बसवण्यातून एक ते तीन किलोवॅट क्षमतेची वीज निर्मितीचा प्रयत्न राहणार आहेे. सोलर पॅनल बसविण्यासाठी महासभेने एक कोटी 82 लाख रुपयांच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली आहे.

प्रदूषण कमी करण्यासाठी केंद्र सरकारने नॅशनल क्लीन एअर प्रोग्रॅम (एन-कॅप) जाहीर केला आहे. त्यात हवा प्रदूषण रोखणे व त्या माध्यमातून 2024 पर्यंत देशभरातील 132 शहरांमधील प्रदूषण पातळी 30 टक्क्यांपर्यंत कमी करण्याचे नियोजन आहे. विकसनशील नाशिकमध्येदेखील प्रदूषणाची पातळी घसरत असल्याच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारच्या पर्यावरण विभागाने नाशिक शहराचादेखील योजनेत समावेश केला आहे.

वायुप्रदूषण रोखण्यासाठी केंद्र सरकारने नाशिक महापालिकेला चाळीस कोटी रुपयांचे अनुदान दिले आहे. या अनुदानातून शहरातील 113 सार्वजनिक शौचालयांवर सौरऊर्जा पॅनल बसविले जाणार आहेत. त्यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाने विद्युत विभागाला प्रस्ताव सादर केला होता.

त्यानुसार एक कोटी 82 लाख रुपये खर्चाच्या प्रस्तावाला महासभेने मंजुरी दिली. या संदर्भातील निविदा प्रक्रियादेखील जाहीर करण्यात आली असून लवकरच पॅनल बसविण्याचे काम सुरू होणार असल्याची माहिती विद्युत विभागाचे अध्यक्ष अभियंता उदय धर्माधिकारी यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com