नाग्यासाक्या योजनेसाठी सौरउर्जा पर्याय

नाग्यासाक्या योजनेसाठी सौरउर्जा पर्याय

नांदगाव । प्रतिनिधी | Nandgaon

तालुक्यात पाणीटंचाईचे (water scarcity) संकट टाळण्यासाठी आमदार सुहास कांदे (mla suhas kande) यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समिती सभागृहात विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचार्‍यांची आढावा बैठक (Review meeting) घेण्यात येऊन उपाययोजनांबाबत नियोजन करण्यात आले.

नांदगाव तालुक्यात (nandgaon taluka) दोन वर्षापासून समाधानकारक पर्जन्यवृष्टी (Rainfall) होत असला तरी बाणगाव बुद्रुक, हिंगणवाडी, जतपूरावस्ती आदी ठिकाणी दोन टँकर (water tanker) मागणीचे प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. जतपूरा येथील पाणीपुरवठा योजनेचे (Water supply scheme) काम पूर्ण झाले असून 5 ते 6 दिवसांत तेथे पाणीपुरवठा सुरळीत होणार असल्याचे येवला ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता पाटील (Patil, Deputy Engineer, Rural Water Supply Department, Yeola) यांनी यावेळी सांगितले.

तालुक्यातील नाग्यासाक्या धरणावर (Nagyasakya Dam) अवलंबून असलेल्या चांदवड (chandwad) व नांदगाव (nandgaon) तालुक्यातील काही गावांना 42 गाव पाणीपुरवठा योजना केवळ वीजबिल भरले नसल्याच्या कारणास्तव बंद असल्याने पाणीटंचाईचा (water scarcity) सामना करावा लागत आहे. त्यामुळे ही योजना त्वरित कार्यान्वित होण्यासाठी स्थापन केलेल्या समितीची बैठक बोलवावी. आमदार निधीसह इतर शासकीय निधीतून (fund) ही योजना सौर ऊर्जेव्दारे (Solar energy) कायमस्वरूपी सुरू करण्याची ग्वाही आ. कांदे यांनी दिली. या योजनेमुळे 80 टक्के गावे दुष्काळमुक्त होतील.

सन 2023 ते 2024 पर्यंत तालुक्यातील अधिकाधिक गावे कायमस्वरूपी टँकरमुक्त करण्याचा मानस आ. कांदे यांनी व्यक्त केला. तालुक्याच्या जलस्रोतातील पाण्याचे नमुने प्रयोगशाळेकडून वेळोवेळी तपासणी करावेत, अशा सूचना देत त्यांनी तालुक्याच्या कुठल्याच भागात पाण्याची कमतरता भासू नये यासाठी अधिकारी व कर्मचार्‍यांनी सतर्क राहून प्रयत्न करावेत, असे आवाहनही आ. कांदे यांनी केले. बैठकीस तहसीलदार सिध्दार्थ मोरे, गटविकास अधिकारी गणेश चौधरी, मनमाड मुख्याधिकारी सचिन पटेल,

नांदगाव मुख्याधिकारी विवेक धांडे, ग्रा.पं. विस्तार अधिकारी देवीदास मांडवडे, विजयकुमार ढवळे, जिल्हा नियोजन समिती सदस्य प्रमोद भाबड, शिवसेना तालुकाप्रमुख किरण देवरे, शहरप्रमुख सुनील जाधव, युवासेनेचे सागर हिरे, अमोल नांवदर, अय्याज शेख आदिंसह विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी, कर्मचारी व ग्रामसेवक उपस्थित होते.

Related Stories

No stories found.