दिशाभुलीने सोसायट्या डबघाईस

पुर्नजिवीत होण्यासाठी शासन दरबारी पाठपुरावा : आ. बोरसे
दिशाभुलीने सोसायट्या डबघाईस

डांगसौंदाणे । वार्ताहर Dangsaundane

अनिष्ट तफावतीत गेलेल्या सर्वच आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटींमधील (Executive Cooperative Societies) शेतकरी (farmer) सदस्यांची सर्वपक्षीय नेत्यांकडून दिशाभुल करत फसवणूक (Cheating) झाल्यानेच आज या सोसायट्या डबघाईस गेल्या आहेत. त्या पुर्नजिवीत करणे आदिवासी भागासाठी काळाची गरज असल्याने हा प्रश्न आपण शासन दरबारी मांडणार असल्याची ग्वाही बागलाणचे (baglan) आ. दिलीप बोरसे (mla dilip borse) यांनी येथे बोलतांना दिली.

आदिवासी विकास महामंडळ (Tribal Development Corporation) व डांगसौंदाणे आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या (Dangsaundane Tribal Various Executive Co-operative Societies) वतीने सोसायटी प्रांगणात आधारभूत मका खरेदी केंद्राचा शुभारंभ आ. दिलीप बोरसे यांचे हस्ते संपन्न झाला. त्यावेळी मार्गदर्शन करतांना ते बोलत होते. निबंधक जितेंद्र शेळके, सटाणा बाजार समिती सभापती पंकज ठाकरे, कैलास बोरसे, सोमनाथ सूर्यवंशी, मधुकर ठाकरे, आदिवासी विकास महामंडळ निरीक्षक पी.के. चौधरी, सोसायटी चेअरमन हिरामण बागुल, व्हा. चेअरमन शांताबाई गायकवाड आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अनिष्ठ तफावतीत गेलेल्या सर्वच आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या डबघाईस गेल्यामुळे याचा मोठा फटका आदिवासी शेतकर्‍यांना बसत असल्याबद्दल चिंता व्यक्त करत आ. बोरसे पुढे म्हणाले, सर्वपक्षीय नेत्यांकडून दिशाभूल करत फसवणूक झाल्याने सोसायटींची ही अवस्था झाली आहे. सोसायटींमुळेच परिसराचे अर्थकारण फिरत असते.

त्यामुळे त्यांना पुर्नजिवीत करणे ही आदिवासी पट्ट्यासाठी काळाची गरज असून आपले सर्वांचेच आद्य कर्तव्य देखील राहणार आहे. हा प्रश्न आपल्या सर्वांच्या समवेत शासन दरबारी मांडणार असल्याचे आ. बोरसे यांनी सांगत आदिवासी पट्ट्यातील जास्तीतजास्त शेतकर्‍यांचा मका खरेदी करण्याच्या सूचना केल्या. या कार्यक्रमात कृषी उत्पन्न बाजार समितीचे (Agricultural Produce Market Committee) नवनिर्वाचित सभापती पंकज ठाकरे (Pankaj Thackeray) यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी उपस्थितांनी पंकज ठाकरे यांना आपल्या कारकिर्दीत तरी डांगसौंदाणे येथे बाजार समिती सुरू होणार का? असा प्रश्न उपस्थित केला असता ठाकरे यांनी लवकरच प्रशासकीय बाबींची पूर्तता करून उपबाजार समिती सुरू करण्याविषयी आश्वासन दिले. विपणन निरीक्षक पि.के. चौधरी यांनी राज्यातील शेतकर्‍यांना किमान आधारभूत किमतीचा लाभ मिळावा तसेच

शेतकर्‍यांना हमीभावापेक्षा कमी किमतीने धान्य विकावे लागू नये यासाठी केंद्र सरकारच्या सूचनेनुसार मका या भरड धानाची खरेदी या केंद्रावर होणार असून नोंदणीकृत शेतकर्‍यांकडून एकरी 15 क्विंटल मका प्रतिक्विंटल 1870 रुपये दराने खरेदी केला जाणार असल्याची माहिती दिली. तसेच जास्तीतजास्त शेतकर्‍यांनी आपला मका विक्रीसाठी आणून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले.

कार्यक्रमास सोसायटी संचालक नारायण सूर्यवंशी, दीपक वाघ, रविंद्र सोनवणे, वसंत बागुल, प्रमोद बैरागी, ज्येष्ठ नागरिक प्रल्हाद केल्हेे, पंढरीनाथ सोनवणे, दगाजी अहिरे, देविदास बागुल, दिनेश सोनवणे, संजय संतोष सोनवणे, नथू बोरसे, सचिव जयवंत देशमुख, सेवक सोमनाथ साबळे आदींसह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते. आधारभूत किंमतीत सोसायटी आवारात मका खरेदी केंद्र सुरू झाल्याने उत्पादकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com