राज्यपालांच्या हस्ते समाजसेविका मोरे सन्मानित

राज्यपालांच्या हस्ते समाजसेविका मोरे सन्मानित

सटाणा । प्रतिनिधी | Satana

तालुक्यातील वटारचे माहेर व चौंधाणे येथील सासर असलेल्या लक्ष्मी मधुकर मोरे यांना राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांच्या हस्ते समाजसेवेबद्दल (Social work) विशेष पुरस्कार (Special award) देऊन सन्मानित करण्यात आले. सामाजिक कार्यासह करोना (corona) काळातील योगदानाबद्दल मोरे यांचा राज्यातील नामांकित समाजसेवकांसोबत गौरव करण्यात आल्याने तालुकाभरात त्यांचे अभिनंदन होत आहे.

मुंबई (mumbai) येथील राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल कोश्यारी, मुंबईचे माजी महापौर सागर नाईक (Former Mayor of Mumbai Sagar Naik), महाराणा प्रताप फाऊंडेशनचे विश्वस्त धनंजय सिंग (Trustee of Maharana Pratap Foundation Dhananjay Singh) आदींसह नामांकित डॉक्टर, कलाकार व समाजसेवक उपस्थित होते.

मोरेंनी ठाणे येथे करोनाचा कहर असतांना कडक लॉकडाऊनच्या (Lockdown) परिस्थितीत गरीब रिक्षाचालकांना मोफत किराणा मालाची व्यवस्था, डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात (Dangsaundane Rural Hospital) करोना रूग्णसेवेसाठी परगावाहून आलेल्या वैद्यकिय पथकासाठी दोनवेळा मोफत जेवणाची व्यवस्था, डांगसौंदाणे ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी ऑक्सिजन पुरवठा (Oxygen supply) करणारे पाच संयंत्रे तसेच मास्क (mask) उपलब्ध करून दिले.

नवे निरपूर रुग्णालयात उपचारासाठी ऑक्सिजन पुरवठा करणारे एक संयंत्र मोफत उपलब्ध करून दिले. तसेच इचलकरंजी येथे अडकलेल्या कंत्राटी मजुरांना किराणा मालाची मोफत व्यवस्था, नगर, संगमनेर येथे महामार्गावर अडकलेल्या कंत्राटी मजुरांना किराणा मालाची मोफत व्यवस्था, मुंजवाड, सटाणा येथील धनगर वस्तीसाठी किराणा मालाची मोफत व्यवस्था करताना धनगर वस्तीमध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या युवकाच्या अनाथ कुटूंबाची संपुर्ण जबाबदारी स्विकारली व त्यांना तीन जोडी कपडे, साडी, वर्षभर पुरेल इतके धान्य आदी व्यवस्था केली.

या व्यतिरिक्त मोरे यांनी आपल्या गावपरिसरात मोठे शैक्षणिक योगदान दिले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी (students) आंतरराष्ट्रीय स्तरावर यशस्वी व्हावेत, यासाठी मोरे यांचे सामाजिक योगदान आहे. चौंधाणे येथील रामगीरबाबा विद्यालय मॉडेल शाळा म्हणून विकसित करण्याचे निश्चित करून मुलींचे स्वछतागृह, विज्ञान प्रयोगशाळा, संपूर्ण नूतनीकरण, शाळेसाठी आधुनिक बेंचेस, प्रत्येक वर्गात फिटिंगसह पंख्याची व्यवस्था, थंड व शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी दोन कुलर, जुनाट फळ्याऐवजी आधुनिक ग्रीनबोर्डची व्यवस्था,

सर्व वर्गामध्ये घड्याळ, नवीन कपाटे व टेबल आदी साहित्य पुरविण्यात आले आहे. सदर कामे त्यांच्या सामाजिक ट्रस्टतर्फे केली जात असून, नैसर्गिक शेती करतांनाच त्याच्या प्रसारासाठीही त्यांचे महत्वपूर्ण कार्य अविरतपणे सुरू आहे. उपरोक्त सर्व कामगिरीची दखल घेत त्यांना राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले आहे.

Related Stories

No stories found.