सामाजिक जाणिवेतून समाजकार्य व्हावे : चव्हाण

सामाजिक जाणिवेतून समाजकार्य व्हावे : चव्हाण

सातपूर | प्रतिनिधी | Satpur

करोनाकाळात (Corona) आरोग्याचे (Health) बरेच प्रश्न निर्माण झाले असून, गोरगरिब जनतेपर्यंत आरोग्यसेवा पोहोचविणे गरजेचे आहे. विशेषत: ज्येष्ठ नागरिक आणि महिलांच्या आरोग्यांच्या प्रश्नावर काम करण्याची गरज आहे. सामाजिक जाणिवेतून समाजकार्य व्हायला हवे, असे प्रतिपादन रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटीच्या अध्यक्षा स्वाती चव्हाण (Swati Chavhan) यांनी केले...

धम्मगिरी सामाजिक, सांस्कृतिक संस्था व रोटरी क्लब ऑफ नाशिक स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने राजीवनगर वसाहतीत आयोजित केलेल्या मोफत नेत्ररोग व दंतरोग तपासणी (Free eye disease and dental checkups) शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होते.

यावेळी उद्योजक तुषार चव्हाण, धम्मगिरी सामाजिक, सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष कैलास जाधव, सचिव डॉ. पल्लवी जाधव, सुजय नेत्र सेवा रुग्णालयाचे डॉ. नानासाहेब खरे, डॉ. सुनिता खरे, जिवक डेंटल क्लिनिकचे डॉ. विशाल जाधव, रोटरीचे मानकर आदी उपस्थित होते.

यावेळी स्वाती चव्हाण म्हणाल्या की, रोटरीच्या (Rotary) माध्यमातून अनेक समाजपयोगी उपक्रम राबविले जात आहेत. यातून समाधान मिळविणे हा एकमेव उद्देश असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी त्यांनी रुग्णांच्या चष्म्याचा व शस्त्रक्रियेचा खर्च रोटरीच्या माध्यमातून केला जाणार असल्याचेही स्पष्ट केले.

दरम्यान, शिबिरात (Camp) १३० रुग्णांच्या डोळ्यांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी ३० रुग्णांना चष्म्याची गरज भासणार आहे. २३ रुग्णांवर शस्त्रक्रिया करावी लागणार असून, २६ रुग्णांच्या डोळ्यांची पुन्हा फेरतपासणी करावी लागणार असल्याचे डॉक्टरांनी (Doctor) स्पष्ट केले. दरम्यान, शिबिरासाठी ॲड. शरद जाधव, पवन भदर्गे, मोहन भदर्गे यांनी प्रयत्न केले.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com