समाजकल्याण विभागाला प्रस्तावांची प्रतीक्षा

समाजकल्याण विभागाला प्रस्तावांची प्रतीक्षा
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागाला Social Welfare Department of Zilla Parishad दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत 40 कोटीचा निधी Funds प्राप्त झाला आहे. मात्र जिल्ह्यात ही योजना राबविण्यासाठी गावपातळीवर वारंंवार आवाहन करुनही आवश्यक प्रस्ताव प्राप्त झालेले नाही. त्यामुळे हा निधी खर्च करायचा तरी कसा, अशी चिंता समाजकल्याण विभागाला आहे. प्रस्ताव देतं का कोणी प्रस्ताव ’असे म्हणण्याची वेळ या विभागावर आली आहे.

दलीत वस्तीत मूलभूत सुविधा देता याव्यात यासाठी शासनाकडून दरवर्षी कोट्यवधीचा निधी जिल्हा परिषदेला प्राप्त होतो. प्राप्त निधीतून दलित वस्तीत रस्त्याचे काँक्रिटीकरण, गटारी, समाज मंदिरे, सभागृहे तसेच प्रथदीप उभारण्याची कामे केली जातात.

निधी अखर्चित

दलित वस्ती सुधार योजनासाठी शासनाकडून जिल्हा परिषदेला 40 कोटी निधी प्राप्त झालेला आहे.त्यासाठी गावपातळीवरून सुमारे 450 प्रस्ताव प्राप्त झाले आहे.व्यक्तिगत लाभाच्या अपंगासाठी चारचाकी गाड़ी व घरकुलासाठी देखील दीड कोटीचा निधी प्राप्त झाला आहे.

काही गावांचे प्रस्ताव बाकी

दलित वस्ती सुधार योजनेसाठीचे 450 प्रस्ताव जिल्हाभरातून आले आहेत. या प्रस्तावांची छाननी केली जात आहे. त्यातून दलित वस्तीतील लोकसंख्या कामाची गरज तपासण्यात येत आहे. परिपूर्ण प्रस्तावासाठी निधीची मंजुरी व कार्यारंभ आदेश देण्यात येत आहे. अजूनही काही गावांचे प्रस्ताव येणे बाकी आहे.

रवींद्र परदेशी, प्रभारी समाज कल्याण अधिकारी, जि. प.

Related Stories

No stories found.