...जेव्हा डॉ. भारती पवार गौराई घटाची पूजा करतात

...जेव्हा डॉ. भारती पवार गौराई घटाची पूजा करतात

त्र्यंबकेश्वर | Trimbakeshwar

आदिवासी जनजाती मंचच्या (Tribal Forum) माध्यमातून चिकाडी (ता . सुरगाणा) येथे महाराष्ट्र दिनी भव्य स्वरुपात सामाजिक एकत्रीकरण कार्यक्रम झाला. आदिवासी जनजाती सुरक्षेकडे शासनाचे लक्ष घालावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली....

कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री केंद्रीय खा. डॉ. भारती पवार (Dr. Bharti Pawar) यांची उपस्थिती होती. अक्षय तृतीयेच्या पार्श्वभूमीवर गौरी घटाचे पूजन करण्यात आले. मंत्री पवार यांनी शिक्षण, विकास यावर भर देण्याचा सल्ला दिला.

...जेव्हा डॉ. भारती पवार गौराई घटाची पूजा करतात
Visual Story : राज ठाकरेंना दुबईवरून धमकीचा फोन आला अन्...

कार्यक्रम त्र्यंबकेश्वर येथील फरशीवाले बाबा यांच्या अध्यक्षतेखाली झाला. जनजाती आयोगाचे प्रकाश गेडाम (Prakash Gedam) तसेच महंत रमनगिरी महाराज यांनी यावेळी मार्गदर्शन केले.

देवता एकलव्याचे प्रतिमापूजन करण्यात आले. धर्माचा अभिमान बाळगा, खऱ्या आदिवासींचे अस्तित्व टिकवावे हा मुख्य विषय घेऊन सजन आदिवासी क्रांतीचे हे पहिले पाऊल आहे, असा दावा बैठकीतील आयोजकांनी केला.

...जेव्हा डॉ. भारती पवार गौराई घटाची पूजा करतात
Visual Story : ...म्हणून धर्मवीर आनंद दिघेंनी नगरसेवकाच्या कानशिलात लगावली

महिला भगिनींनी अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर गौराई घटाची पूजन केले. डॉ. भारती पवार यांनीही गौराई डोक्यावर घेत कार्यक्रमात सहभाग घेतला. कार्यक्रमाला त्र्यंबकेश्वर तालुका वारकरी महामंडळाचे देविदास जाधव, हभप जनार्दन पारधी, हभप सिताराम बाबा, महंत ताराबाई बागुल होमपाडा, हभप सदाशिव महाराज आमलोण, हभप कृष्ण महाराज जोपळे, पेठ ता. अध्यक्ष पंढरीनाथ वालवणे, हभप युवा किर्तनकार अश्विनी चौधरी आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.