शिक्षणातून सामाजिक विकास: आ. कोकाटे

महात्मा फुले शैक्षणिक संकुलात मैदान सुशोभिकरण उद्घाटन
शिक्षणातून सामाजिक विकास: आ. कोकाटे

सिन्नर । वार्ताहर | Sinnar

महात्मा फुले शैक्षणिक संकुल (Mahatma Phule Educational Complex) तळागाळातील विद्यार्थ्यांसाठी (students) कार्यरत आहे.

विद्यार्थ्याच्या प्रगतीसाठी धडपडणार्‍या या सस्थेत महात्मा फुले (Mahatma Phule) व सावित्रीबाई फुले (Savitribai Phule) यांच्या स्वप्नातील सबलीकरण खर्‍या अर्थाने होताना दिसते. शिक्षणातूनच (education) सामाजिक विकास (Social development) घडून येत असतो असे प्रतिपादन आमदार माणिकराव कोकाटे (MLA Manikrao Kokate) यांनी केले.

येथील महात्मा फुले शैक्षणिक संकुलात मैदान सुशोभिकरणाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी तेे बोलत होते. अध्यक्षस्थानी संस्था अध्यक्ष चंद्रकांत वरंदळ होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्ह्याचे शिक्षणाधिकारी मच्छिंद्र कदम (District Education Officer Machindra Kadam) उपस्थित होते.

व्यासपिठावर संस्थेचे सेक्रेटरी विष्णूपंत उपाध्यक्ष विक्रम भगत, खजिनदार संजय लोंढे, उच्च माध्यमिक विभाग शालेय समितीचे अध्यक्ष किरण लोणारे, माध्यमिक विभाग शालेय समितीच्या अध्यक्षा अर्चना बलक, संचालक कैलास झगडे, योगेश पाचोरे, माजी संचालक विजय वरंदळ, राजेंद्र भगत उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी सखोल अभ्यास करावा, सातत्य ठेवावे, शरीर सुदृढ ठेवावे, सतत वाचन करण्याचे आवाहन कदम यांनी यावेळी जेष्ठ शिक्षिका शोभा नागरे यांचा सेवापूर्तीनिमित्त सत्कार करण्यात आला.

सगर विद्या प्रसारक संस्थेचे अनेक विद्यार्थी विविध क्षेत्रात मोठ्या पदावर कार्यरत आहेत. सामाजिक (social) व आर्थिकदृष्ट्या (Financially) मागासलेल्या विद्यार्थ्यांना शिकवून पुढे आणण्याची संस्थेची नेहमीच धडपड आहे आणि ती कायम राहील असे वरंदळ म्हणाले. संस्थेचे सहसेक्रेटरी राजेंद्र आंबेकर (Joint Secretary Rajendra Ambekar) यांनी प्रास्ताविकातून संकुलाच्या प्रगतीचा घेतला.

सूत्रसंचलन अमोल आंबेकर व तृप्ती फडके यांनी केले. आभार किमान कौशल्य विभागाचे उपप्राचार्य किरण गवळी यांनी मानले. यावेळी माजी प्राचार्य दिनकर गोळेसर, दशरथ लोंढे, प्राचार्य रामनाथ लोंढेे, प्राथमिक विभागाच्या मुख्याध्यापिका संगीता राजगुरु, पर्यवेक्षक रमेश बलक, उपमुख्याध्यापक राजेंद्र महात्मे, उच्च माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य तानाजी ढोली उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com