जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत दुपारपर्यंत 'इतके' मतदान

जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत दुपारपर्यंत 'इतके' मतदान

नाशिक | Nashik

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीची (Zilla Parishad Employees Co-operative Credit Society ) बिनविरोधाची हॅटट्रीक हुकल्यानंतर सत्ताधारी आपला व विरोधकांच्या सहकार पॅनलमध्ये अटीतटीची लढत होत आहे...

जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंधरा जागांसाठी नाशिक येथील मराठा हायस्कूल (Maratha High School) गंगापूर रोड याठिकाणी सकाळी ८ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली आहे. एकूण १४०० मतदार (voter) या निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तसेच दुपारी १२.३० वाजेपर्यंत ७०० मतदारांनी मतदान केले असून जवळजवळ ५० टक्के मतदान (voting) झाले आहे.

दरम्यान, दुपारी ४ वाजेपर्यंत हे मतदान सुरु राहणार असून त्यानंतर ४.३० वाजता मतमोजणी होणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत सत्ताधारी पॅनल आपली सत्ता कायम राखतो की सहकार पॅनल बाजी मारतो हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com