
नाशिक । प्रतिनिधी | Nashik
नाशिक जिल्हा मजूर फेडरेशनच्या संचालकपदांसाठी आज निवडणूक (Nashik District Labor Union Election) होत असून सकाळी ८ वाजेपासून मतदानास (Voting) सुरुवात झाली आहे...
सुरुवातील सकाळच्या सत्रात मतदारांचा (Voters) कमी प्रतिसाद दिसून आला. तर नंतर मतदानासाठी मतदारांमध्ये उत्साह दिसत होता. यात सकाळी ८ ते ९ या वेळेत ६.९३ टक्के तर ९ ते १० या दरम्यान १२.७५ टक्के इतके मतदान झाले. तसेच १० ते ११ या वेळेत २०.७९ तर ११ ते १२ दरम्यान ३६.३२ टक्के मतदान झाले होते. तसेच १२ ते १ या वेळेत ५४.२५ टक्के मतदान झाले होते. एकीकडे प्रत्येक तालुक्यातील मतदार मतदानाचा हक्क बजावताना दिसत आहे. तर दुसरीकडे मात्र नांदगावमधून (Nandgaon) आतापर्यंत एकाही मतदाराने मतदान केलेले नाही.
दरम्यान, या अगोदरच जिल्हा मजूर फेडरेशनच्या ८ तालुका संचालकांची बिनविरोध (Unopposed) निवड झाली आहे. तर उर्वरित ७ तालुका संचालक आणि ५ जिल्हास्तरीय संचालक अशा एकूण १२ जागांसाठी ३६ उमेदवार (candidate) निवडणूक रिंगणात आहेत.