जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत 'इतके' टक्के मतदान; मतमोजणीस सुरुवात

जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीत 'इतके' टक्के मतदान; मतमोजणीस सुरुवात

नाशिक | Nashik

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीची (Zilla Parishad Employees Co-operative Credit Society)बिनविरोधाची हॅटट्रीक हुकल्यानंतर सत्ताधारी आपला व विरोधकांच्या सहकार पॅनलमध्ये अटीतटीची लढत होत आहे...

जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या पंधरा जागांसाठी नाशिक येथील मराठा हायस्कूल (Maratha High School) गंगापूर रोड याठिकाणी सकाळी ८ वाजेपासून मतदानास सुरुवात झाली होती. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता मतदान संपले. यावेळी १४०० मतदारांपैकी ११३८ मतदारांनी मतदानाचा हक्क (Right to vote) बजावला असून जि.प. कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या निवडणुकीसाठी एकूण ७७.८५ टक्के मतदान झाले आहे.

दरम्यान, यानंतर मतमोजणीस सुरुवात झाली असून रात्री उशीरापर्यंत मतमोजणी (counting of votes) चालणार आहे. त्यामुळे या निवडणुकीत नेमका कोणता पॅनल बाजी मारणार हे चित्र निकालानंतरच स्पष्ट होईल.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com