जिल्हा परिषदेचा 'ईतका' निधी खर्च

हिशेबाचा ताळमेळ जुळवण्यात बांधकाम विभाग पिछाडीवर
जिल्हा परिषदेचा 'ईतका' निधी खर्च

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषदेला ( Zilla Parishad Nashik ) मागील वर्षी 477 कोटी रुपये इतका निव्यत्यय मंजूर झाला होता.त्यापैकी 90 टक्के निधी खर्च झाला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

यावर्षी प्रथमच मार्चएंडची देयके देण्याची कामे एप्रिलमध्येच पूर्ण झाली आहेत. सध्या सर्व विभागांकडून ताळमेळ करून दायीत्व निश्चित करणे व त्या आधारित कामांचे नियोजन करण्याचे काम वेगात सुरू आहे. जिल्हा परिषदेला मागील वर्षी 477 कोटी रुपये नियतव्यय मंजूर झाला होता. त्या निधीतून 2020-21 व 2021-22 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेली कामे करण्यात आली.

यावर्षी वित्त विभागाने पहिल्यांदाच झेडपी एफएमएस व पीएफएमएस या ऑनलाईन प्रणालीवर नोंदली गेलेलीच देयके 31 मार्चनंतर देण्यात येतील, असे परिपत्रक काढले. यामुळे मार्च अखेरची देयके देण्याचे जूनपर्यंत चालणार्‍या दरवर्षाच्या प्रथेला आळा बसला आहे.यामुळे एप्रिलमध्मेच मार्च अखेरची कामे संपली असून सर्व विभागांकडून मागील वर्षाच्मा खर्चाचा हिशेब करूनत्याचा वित्त विभागाकडून ताळमेळ करण्याचे काम सुरू आहे.

असे चित्र एकीकडे असले तरी बांधकाम विभागाच्या हिशेबाचा ताळमेळ जुळण्यात तब्बल महिनाभराचा कालावधी गेला असून त्यांनी आता ताळमेळासाठी वित्त विभागाकडे फाईल्स पाठवल्या आहेत. त्यामुळे अंतिम ताळमेळ निश्चित झाला नसला, तरी आतापर्यंत 90 टक्के खर्च झाल्याचा प्राथमिक अंदाज असल्याची माहिती मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश बच्छाव यांनी दिली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com