नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 'इतके' अर्ज वैध

नगरपंचायतींच्या निवडणुकीसाठी 'इतके' अर्ज वैध

नाशिक । प्रतिनिधी

जिल्ह्यातील सहा नगरपंचायतींसाठी दाखल झालेल्या 402 अर्जांपैकी 328 अर्ज वैध तर 84 अर्ज अवैध ठरवण्यात आले. पेठ, सुरगाणा, निफाड, देवळा, कळवण आणि दिंडोरी या मुदत संपलेल्या नगरपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. दरम्यान, देवळा नगरपंचायतीची आकडेवारी उपलब्ध नसल्याने पाच नगरपंचायतींत 328 उमेदवार रिंगणार राहिले आहेत.

कळवण Kalwan नगरपंचायतीसाठी एकूण 91 उमेदवारी अर्जांपैकी 67 उमेदवारांचे अर्ज वैध तर 24 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत. कळवणच्या नगराध्यक्ष सुनीता कौतिक पगार या बिनविरोध निवडून आल्या आहेत.

विशेष म्हणजे त्या कळवण येथील पहिल्या नगरसेविका आणि पहिल्याच नगराध्यक्षा आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहेत. गेली निवडणूक चांगलीच गाजली होती. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार नितीन पवार आणि कळवण नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार यांनी बाजी मारली होती. नगरपंचायतीच्या पहिल्या निवडणुकीतही सुनीता पगार या बिनविरोध निवडून आल्या होत्या.

दिंडोरी Dindori नगरपंचायतीसाठी 54 उमेदवारी अर्जांपैकी सर्व अर्ज वैध ठरवण्यात आले आहेत. पेठ नगरपंचायतीसाठी 75 अर्ज आले आहेत. त्यात पहिल्या महिला नगराध्यक्ष लता सातपुते व नंतरचे अडीच वर्षे नगराध्यक्ष राहिलेले मनोज घोंगे यांचा समावेश आहे. 75 अर्जांपैकी 73 अर्ज वैध तर दोन अर्ज अवैध ठरवण्यात आले.

देवळा Deola नगरपंचायतीसाठी 60 अर्ज आले आहेत. निफाड नगरपंचायतीसाठी 81 जणांनी उमेदवारी दाखल केली आहे. त्यात 58 अर्ज वैध तर 13 अर्ज अवैध ठरवण्यात आले आहेत.

सुरगाणा Surgana येथे 74 अर्ज दाखल झाले. त्यापैकी 66 अर्ज वैध तर आठ अर्ज अवैध ठरवण्यात आले.

राज्य सरकारने काढलेल्या ओबीसी आरक्षणाच्या अध्यादेशाला सर्वोच्च न्यायालयाने नुकतीच स्थगिती दिली आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील 27 टक्के आरक्षण असलेल्या मागासवर्गीय प्रवर्गातील राखील प्रभागांची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. त्यात देवळा येथे चार, निफाड येथे तीन प्रभागांची निवडणूक रद्द करण्यात आली आहे. तर कळवणमध्ये दोन प्रभागांची निवडणूक रद्द करण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.