जिल्ह्यातील 'इतके' आरोग्यसेवक अद्यापही दुसर्‍या डोसविना!

जिल्ह्यातील 'इतके' आरोग्यसेवक अद्यापही दुसर्‍या डोसविना!

नाशिक । प्रतिनिधी Nashik

एकीकडे राज्यासह जिल्ह्यात करोनाच्या corona तिसर्‍या बूस्टर डोसला Booster dose सुरुवात झाली असताना नाशिक जिल्ह्यातील 22 हजार आरोग्य सेवकांनी दुसरा डोसच घेतला नसल्याचे Second dose of vaccination धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

राज्यात करोनाच्या पार्श्वभूमीवर 10 जानेवारीपासून बूस्टर देण्यास सुरवात केली आहे. यामध्ये सुरवातीला आरोग्य कर्मचारी, फ्रंटलाईन वर्कर्स आणि जेष्ठ नागरिकांचा समावेश आहे. मात्र, तत्पूर्वी जिल्ह्यातील आरोग्य सेवकांनी दुसरा डोसचं घेतला नसल्याचे समोर आले आहे. अद्याप जिल्ह्यातील जवळपास 22 हजार आरोग्य कर्मचार्‍यांनी दुसरा डोस घेतलेला नाही. याबद्दल आरोग्य विभागाने Department of Health चिंता व्यक्त केली आहे.

करोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वात आधी आरोग्य कर्मचार्‍यांचे लसीकरण करण्यात आले. त्याचबरोबर आता नव्याने बूस्टर डोस देखील आरोग्य कर्मचार्‍यांना देण्यात येत आहे. अद्याप दुसरा डोसच घेतला नसल्याने तेव्हा बूस्टर डोस हे कर्मचारी घेणार कधी? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर आता ‘ओमायक्राॅॅन’ हा नवा व्हेरिएंट आल्याने केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिबंधित लसीकरण हाच कोरोनाला रोखण्याचा ठोस उपाय असल्याचे स्पष्ट केले आहे. त्या पार्श्वभूमीवर पहिला, दुसरा असे लसीचे दोन डोस नागरिकांना देण्यात आले. सध्या तिसऱ्याआणि बूस्टर डोसचे लसीकरण सुद्धा सुरु झाले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com