महाटीईटीसाठी 'एवढे' उमेदवार

महाटीईटीसाठी 'एवढे' उमेदवार

नाशिक । प्रतिनिधी Nashik

आरोग्य विभागाच्या (Department of Health) परीक्षांमुळे महाटीईटी परीक्षेच्या (MahaTET exams) वेळापत्रकात सुरुवातीला बदल करण्यात आल्यानंतर पुन्हा टीईटी (TET) पुढे ढकलण्यात आली.देगलूर-बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीमुळे (Assembly by-elections) महाटीईटी परीक्षा पुढे (postpond) ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यामुळे सुधारित वेळापत्रकानुसार आता ही परीक्षा रविवारी (दि. 21) घेतली जाणार आहे.

राज्य परीक्षा परिषदेतर्फे (State Examination Council) ही परीक्षा घेतली जाणार असून 28 हजार परीक्षार्थी प्रविष्ट होणार आहे. परीक्षा सुरू होण्यापूर्वी विद्यार्थ्यांना 20 मिनिटे अगोदर परीक्षा केंद्रात (Examination Center) प्रवेश दिला जाईल. विद्याथ्र्यांना पेन, प्रवेशपत्र, ओळखपत्र हे साहित्य घेऊन जाता येईल. या परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी शिक्षण विभागातर्फे (Department of Education) बुधवारी (दि. 17) बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी राजीव म्हसकर जिल्हा परीक्षा नियंत्रक म्हणून कामकाज पहात असून त्यांनी सर्व केंद्र संचालक, झोनल अधिकारी, सहायक परीरक्षक यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपशिक्षणाधिकारी नीलेश पाटोळे, संतोष झोले, विस्तार अधिकारी सी. बी. गवळी आदी उपस्थित होते.

शिक्षक होण्यासाठी अनिवार्य असलेली शिक्षक पात्रता परीक्षेचे (महाटीईटी) वेळापत्रक काही दिवसांपूर्वी जाहीर झाले होते. सुरुवातीला ही परीक्षा 10 ऑक्टोबरला घेतली जाणार होती. मात्र या दिवशी केंद्रीय लोकसेवा आयोगाची (Central Public Service Commission) लेखी परीक्षा असल्याने या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी आल्याने विद्यार्थ्यांना दोन्ही परीक्षांना प्रविष्ट होता आले नसते.

विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये या उद्देशाने परीक्षा परीषदेतर्फे टीईटी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. ऐनवेळी परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली होती . त्यानंतर आता सुधारीत वेळापत्रकानुसार 21 रोजी परीक्षा घेण्यात येणार आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com