मविप्र निवडणूकीसाठी 'इतके'अर्ज दाखल; अर्जांची छाननी आज

२१ जागांसाठी ३०५ उमेदवारांचे ४१० अर्ज दाखल
मविप्र निवडणूकीसाठी 'इतके'अर्ज दाखल; अर्जांची  छाननी आज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

 मविप्र निवडणुकीच्या ( MVP Elections ) रिंगणात उतरण्यासाठी अर्ज दाखल करणारांमध्ये  इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात यावेळी दिसून येत आहे.अर्ज दाखल करण्याच्या पाच दिवसांच्या विहित मुदतीत २१ जागांसाठी ३०५ उमेदवारांनी ४१० अर्ज दाखल केले.अर्ज दाखल करण्याच्या अखेरच्या दिवशी विद्यमान चिटणीस डॉ. सुनील ढिकले यांनी अध्यक्ष, सरचिटणीस आणि सभापतीपदासाठी अर्ज दाखल केला. विद्यमान सरचिटणीस निलिमा पवार (MVP General Secretary Nilima Pawar )यांच्या कन्या अमृता पवार याही निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज झाल्या असून त्यांनी महिला राखीव गटातून उमेदवारी दाखल केली आहे.

परिवर्तन पॅनलचे नेते आमदार माणिकराव कोकाटे यांनी अध्यक्षपदाबरोबरच सभापतीपदासाठी, विद्यमान अध्यक्ष डॉ. तुषार शेवाळे यांनी चिटणीसपदासाठी अर्ज दाखल केले आहेत.यामुळे कोणत्या पदासाठी कोण उमेदवार राहणार याचे राजकीय आडाखे बांधण्यात सभासद मग्न आहेत.यातून सभासदांमेह्ये उमेदवारीचा संभ्रम वाढत आहे.

निवडणुकीसाठी विक्रमी ७५० अर्जाची विक्री झाली आहे. गुरूवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता तरी देखील प्रगती व परिवर्तन पॅनलच्या उमेदवारांनी अगोदरच अर्ज दाखल केलेले असल्याने, गुरूवारी गर्दी नव्हती. प्रगती पॅनलचे प्रमुख डॉ. सुनील ढिकले यांनी पॅनल उमेदवारांसमवेत अर्ज दाखल न केल्याने त्यांच्या उमेदवारीबाबत उलटसुलच चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र, डॉ. ढिकले यांनी गुरूवारी अध्यक्ष पदासह, उपाध्यक्ष, सभापती, उपसभापती, चिटणीस अशा विविध पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केले.

यावेळी आमदार राहुल ढिकले, केदा आहेर, दत्तात्रय पाटील, प्रणव पवार, गणपतराव पाटील,राजेंद्र डोखळे,सुनील खुने यांच्यासह नाशिक,निफाड तालुक्यातील सभासद आदी उपस्थित होते. पदाधिकारी पदासाठी अर्ज करणाऱ्या अ‍ॅड. रवींद्र पगार यांनी सटाणा तालुक्यातून अर्ज दाखल केला.संस्थेचे माजी सरचिटणीस स्व. मालोजीराव मोगल यांचे पुत्र राजेंद्र मोगल यांनी उपाध्यक्ष, उपसभापती पदासाठी अर्ज दाखल केला आहे. दिंडोरी तालुका संचालक दत्तात्रये पाटील यांनी देखील उपसभापती, उपाध्यक्ष, चिटणीसपदासाठी अर्ज दाखल केला. उपाध्यक्ष, उपसभापती व चिटणीसपदासाठी तसेच निफाड तालुका सदस्य पदासाठी सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले आहेत.

दाखल झालेले उमेदवार (कंसात उमेदवारी अर्ज )

अध्यक्ष : १२ (१६), उपाध्यक्ष : २९ (३३), सभापती : १० (१६), उपसभापती: ३४ (३८), सरचिटणीस: ८ (१०), चिटणीस: २८ (३३), महिला राखीव दोन जागा : २५ (३४), नाशिक ग्रामीण: १० (१४), नाशिक शहर: ६ (१०), सिन्नर: ९ (१६), दिंडोरी-पेठ: ६ (११), कळवण-सुरगाणा: १२ (१९), इगतपुरी: १३ (१७), चांदवड: ६ (१२), निफाड: २० (२२), नांदगाव: १० (१८), सटाणा: १५ (१७), मालेगाव: १० (१३), येवला: १० (१५), देवळा: ११ (१७), उच्च.माध्य. व महाविद्यायीन: ६ (८), प्राथ. व माध्य. सेवक: १५ (२१).

अमृता पवार सक्रिय

यावेळच्या निवडणुकीत सरचिटणीस नीलिमा पवार यांच्या कन्या अमृता पवार या देखील निवडणूक रिंगणात उतरणार अशी चर्चा सुरुवातीपासूनच होती.त्यामुळे प्रगती पॅनलच्या उमेदवारांबरोबरच त्याही अर्ज दाखल करतील,अशी चर्चा होती. मात्र,त्यांनी अखेरच्या दिवशी महिला राखीव गटातून अर्ज दाखल करत निवडणुक रिंगणात एन्ट्री केल्याचे बघायला मिळाले.

आज होणार छाननी

उमेदवारी अर्जाची शुक्रवारी (दि.१२) छाननी सकाळी ८ ते १२ दरम्यान होणार आहे. त्यांनतर पात्र अर्जाची यादी प्रसिध्द केली जाईल. यावर हरकतीसाठी शनिवारी (दि.१३) व रविवारी (दि.१४) दोन दिवस मुदत आहे. १६ आॅगस्टला हरकतींवर सुनावणी होऊन उमेदवारांची यादी प्रसिध्द केली जाणार आहे.१९ आॅगस्टपर्यंत माघारीसाठी मुदत राहणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com