..तर 'त्या' रुग्णालयांवर होणार कारवाई

..तर 'त्या' रुग्णालयांवर होणार कारवाई
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील 318 रुग्णालयांनी फायर ऑडिटच ( Hospitals Fire Audits )केले नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात संबंधित सर्व रुग्णालयांना मनपाच्या अग्निशमन विभागाच्या ( NMC- Fire Brigade ) वतीने नोटिसा बजावून वीज कापण्यासह पाणीपुरवठा खंडित करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

शहरातील 607 रुग्णालयांपैकी केवळ 289 रुग्णालयांनीच फायर ऑडिट केले आहे. मात्र दरवर्षीप्रमाणे केवळ नोटीस बजावण्याचेच सोपस्कार होणार की प्रत्यक्ष कारवाईचा बडगा उगारला जाणार, अशी चर्चा सुरु झाली आहे.

वसई विरार येथील खासगी रुग्णालयापाठोपाठ अहमदनगर जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातील शॉर्टसर्कीटच्या घटनेनंतर रुग्णालयांमध्ये अग्निप्रतिबंधक यंत्रणांची सक्ती क्रमप्राप्त बनली आहे. या अग्निप्रतिबंधक यंत्रणांचे संबंधित रुग्णालयांनी वर्षातून दोन वेळा फायर ऑडिट करणे बंधनकारक आहे.

मात्र नाशिक शहरातील 607 रुग्णालयांपैकी जेमतेम 289 रुग्णालयांनीच या नियमाची अंमलबजावणी केली असून महापालिकेच्या अल्टीमेटमनंतरही 318 रुग्णालयांनी फायर ऑडिटच केले नसल्याची माहिती समोर आली आहे.

इमारती तसेच पंधरा मीटरपेक्षा अधिक उंच रहिवासी वापराच्या इमारतींना अग्निप्रतिबंधक यंत्रणा रुग्णालयांनीच लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. ही यंत्रणा सुस्थितीत आहे की नाही, त्याची खातरजमा करण्यासाठी वर्षातून दोनदा म्हणजे जानेवारी व जुलै महिन्यात फायर ऑडिटचे बी- प्रमाणपत्र मुख्य अग्निशमन अधिकार्‍यांकडून प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com