प्रा. डॉ. तायडे यांना एस. एन डी टी. विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर

प्रा. डॉ. तायडे यांना एस. एन डी टी. विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट पुरस्कार जाहीर

नाशिक | प्रतिनिधी

एस.एन.डी.टी महिला विश्व विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ठ शिक्षक पुरस्कार या वर्षी नाशिकच्या एस. एम. आर. के. महिला महाविद्यालयाच्या संगीत विभागाचे प्रमुख प्रा. डॉ. अविराज तायडे यांना जाहीर झाला आहे...

रोख रक्कम, स्मृतीचिन्ह आणि प्रमाणपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. एस. एन.डी.टी विद्यापीठातील संपूर्ण देशातील 120 महाविद्यालयाच्या सर्व शिक्षकांमध्ये हा पुरस्कार मानाचा समजला जातो. प्राध्यापकाच्या एकूण शिक्षणासोबत त्यांचे समाजिक व इतर सर्व निकष या पुरस्काराच्या निवडीसोबत लावले जातात.

पाच वर्षांत प्राध्यापकाने किती रिसर्च पेपर्स प्रकाशित केले आहेत. महाविद्यालयाच्या प्राचार्यांचा गोपनीय अहवाल, विद्यार्थिनींची प्रतिक्रिया, एपीआय स्कोर आणि इतर निकषावरही निवड केली जाते.

अतिशय गुंतागुंतीच्या या प्रक्रियेतून सर्वोत्कृष्ट शिक्षकांची निवड केली जाते. या संपूर्ण यशाचे श्रेय त्यांनी आपले गुरु, आईवडील, सर्व कुटुंबीय, मित्रपरीवार तसेच महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दीप्ती देशपांडे, उप प्राचार्य डॉ कविता पाटील व डॉ नीलम बोकील यांना दिले आहे. संस्थेचे सचिव डॉ. मो. स. गोसावी यांनी प्रेरणा सतत असल्याचेही डॉ तायडे सांगतात.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com