देवळालीत दहा फुटी धामण जेरबंद

देवळालीत दहा फुटी धामण जेरबंद

देवळाली कॅम्प | Deepali Camp

येथील देवी मंदिर परिसरात राहणाऱ्या दिनेश गोविल यांचे घरालागत ऐन दुपारी 10 फुटी सर्प दिसतात एकाच घाबरगुंडी उडाली.

मात्र विजय नगर येथील सर्प मित्र मंगेश परदेशी यांनी रेस्क्यू करीत या धामण जातीच्या सर्पस लीलया जेरबंद केले उन्हाची तीव्रता वाढल्याने सरपटणारे प्राणी देखील हैराण झाले आहेत.

देवी मंदिर परिसरात गोविल यांचे परस बागेत मोठा सर्प आढळून आल्याने त्यांनी तातडीने महाराष्ट्र वन्य जीव संघटनेचे सदस्य,ओम साई राम सेवाभावी मंडळाचे पदाधिकारी, सर्प मित्र मंगेश परदेशी यांना माहिती दिली असता ते तात्काळ हजर झाले.

त्यानी १० फूट रॅट स्नेक (धामण)या जातीच्या सर्पास रेस्क्यू करीत अलगद जेरबंद केल्याने येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला. परदेशी यांचे शालिग्रामजी गोविल तसेच ओम साई राम सेवाभावी मंडळाचे अध्यक्ष तानाजी भोर यांनी निस्पृह समाज सेवे बद्दल अभिनंदन केले.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com