साप समजून पकडला, निघाला अजगर

साप समजून पकडला, निघाला अजगर

नाशिक | प्रतिनिधी Nashik

इगतपुरी तालुक्यातील (Igatpuri Taluka) एका बंद कंपनीत साप (Snake) निघाल्याचे येथील सर्पमित्राला समजले. यानंतर तात्काळ सर्पमित्राने या सापाला पकडण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अथक प्रयत्नांच्या अंती साप पकडला. मात्र, हा साप नसून अजगर असल्याचे समजताच येथील अनेकजन बिथरले....

साडेतीन फुटाचे हे अजगराचे पिल्लू होते. काल (दि १५) संध्याकाळी 5 च्या सुमारास ही घटना घडली. येथील मुंबई आग्रा हायवे (Mumbai-Agra Highway) लगत असलेल्या कंपनीतील सुरक्षा रक्षकांना अजगर दिसून आला. त्यांनी त्वरित सर्पमित्र नितेश भारती (Snake Friend Nitesh Bharati) यांना याबाबतची माहिती दिली.

सुरुवातीला हा अजगर (Python) काही हाताला लागत नव्हता यानंतर येथील लाकडे पाला पाचोळा बाजुला करुन या अजगराला शिताफीने पकडण्यात आले. पकडलेला अजगर हे पिल्लू असुन वनविभागाला (Forest Dept) याबाबतची माहिती देण्यात आली. या अजगराच्या पिल्लाला लवकरच नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com