
पेठ | प्रतिनिधी | Peth
नाशिक (Nashik) आगराची बस (Bus) वापीहून नाशिककडे (Vapi to Nashik) येत असतांना बसच्या इंजिनातून अचानकपणे धूर निघाल्याने प्रवाशांसह चालक-वाहकाची चांगलीच तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले...
याबाबत अधिक माहिती अशी की, बस क्रमांक एमएच १४ बीटी ४५७० ही बस वापीहून नाशिककडे येत असतांना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास पेठ बस स्थानकाकडे येताना जुना बस स्टॅण्ड चौकात अचानक इंजिनातून मोठ्या प्रमाणावर धूर (smoke) निघू लागला. त्यानंतर चालकाने बस थांबवून प्रवाशांना तात्काळ बसमधून खाली उतरविले. त्यामुळे सुदैवाने मोठी जीवितहानी टळली.
दरम्यान, यानंतर रस्त्याने एक ट्रॅक्टर पाण्याच्या (Water) टाक्या भरून जात असताना तात्काळ त्या पाण्याच्या सह्याने बसची पेटलेली वायरींग नागरिकांच्या सहकार्याने विझविण्यात आली. तसेच पेठ (Peth) आगारातून आग विरोधक गॅस सिलेंडरच्या सह्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. त्यानंतर प्रवाशांची इतर बसेसच्या माध्यमातून जाण्याची व्यवस्था करण्यात आली.