दहीपुलरोड होणार स्मार्ट

कामासाठी धुमाळ पॉईंट ते गंगेपर्यंतचा मार्गात बदल
स्मार्ट रोड
स्मार्ट रोड

नाशिक । Nashik

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत धुमाळ चौक ते गाडगे महाराज पुलापर्यंतच्या रस्त्याचे दोन टप्प्यात कामाला प्रारंभ होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या मार्गावरील वाहतुकीच्या मार्गात बदल करण्यात आल्याची अधिसूचना नाशिक शहर वाहतूक शाखेच्या उपायुक्त पौर्णिमा चौघुले-श्रींगी यांनी जारी केली आहे.

पहिल्या टप्प्यामध्ये जिजामाता चौक ते गाडगे महाराज पुलापर्यंत आणि दुसर्‍या टप्प्यात धुमाळ चौक (वंदे मातरम् चौक) ते जिजामाता चौक यापर्यंतचे काम होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर या मार्गाचे काम होईपर्यंत प्रायोगिक तत्त्वावर वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे. जिजामाता चौक ते गाडगे महाराज पुलाकडे जाणारा मार्ग सर्वप्रकारच्या वाहनांसाठी बंद करण्यात येत आहे.

धुमाळ चौकातून जिजामाता चौकाकडे फक्त दुचाकी, तीनचाकी वाहने जा-ये करतील व तेथून पर्यायी मार्गाचा वापर करतील. तर दुसर्‍या टप्प्यात धुमाळ चौक ते जिजामाता चौकाचे काम सुरू झाल्यानंतर सदरचा मार्ग बंद करून मेनरोडच्या धुमाळ चौकाकडून गाडगे महाराज पुलाकडे जाणारी-येणारी वाहतूक गाडगे महाराज पुतळामार्गे बुधा हलवाई मिठाईकडून इतरत्र जातील. अथवा, रविवार कारंजा- बोहर पट्टी मार्गे - भांडी बाजार मार्गे पर्यायी मार्गाचा वापर करतील.

तसेच, धुमाळ चौक ते जिजामाता चौक- सराफ बाजार - प्रकाश सुपारी दुकान ते बादशाही कॉर्नर हा मार्ग नो-पार्किंग, नो हॉल्टींग झोन करण्यात आलेला आहे. सदरील आदेशाचे उल्लंघन केल्यास कारवाई करण्याचाही इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com