स्मार्ट नाशिकच्या 'स्मार्ट पोलिसिंग'ची सर्वदूर चर्चा;अशी आहे मोहीम

स्मार्ट नाशिकच्या 'स्मार्ट पोलिसिंग'ची सर्वदूर चर्चा;अशी आहे मोहीम

नाशिक । Nashik

शहरात सुरक्षेच्या दृष्टीने 'स्मार्ट पोलिसिंग' (Smart policing) काळाची गरज बनल्याने अद्ययावत कॅमेऱ्यांसह माहिती तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरासाठी विविध प्रकारची यंत्रसामग्री (Machinery) बसविण्यासाठी पोलिस यंत्रणेकडून (Police system) सज्जता केली जात आहे. त्यासाठी स्मार्ट सिटीनेही (smart city) साथ दिल्याने या दोन्ही यंत्रणांच्या साथीने शहरात आता "स्मार्ट पोलिसिंग' मार्गी लागण्याची चिन्हे आहेत...

शहरांतर्गत वाहतूक सुरक्षेसाठी ( traffic safety) पोलिसांनी हाक दिली आणि महापालिका, स्मार्ट सिटीसह आरटीओ प्रशासन एकत्र आले. चारही प्रशासकीय यंत्रणा शहरासाठी एकत्र आल्याने कामांनाही जोमाने सुरुवात झाली आहे. पोलिसांनी (polic) स्वतःला 'अपग्रेड' करून घेण्यासाठी स्मार्ट सिटीकडे यंत्रसामग्रीची मागणी केली आहे. त्यासाठी झालेल्या बैठकीत गुन्हेगारी निर्मूलनासह (Crime eradication) सुरक्षित शहर व प्रशासकीय यंत्रणांमधील समन्वयावर विचारमंथन होऊन स्मार्ट सिटीनेही मदतीचा हात पुढे केल्याने 'भयमुक्त नाशिक' या पोलिसांच्या मोहिमेलाही मोठा फायदा होण्याची शक्यता आहे.

पोलिसांच्या मागणीनुसार स्मार्ट सिटीकडे या विविध कामांसाठी निधीची (funds) तरतूद आहे. त्यानुसार पोलिसांनाही स्मार्ट होण्यास मदत होईल. शिवाय नाशिककरांचीही सुरक्षा वाढेल. या पार्श्वभूमीवर एका वेंडरने संबंधित सामग्रीसाठीचे प्रात्यक्षिक व कोटेशन या बैठकीत दाखविले. त्यानुसार इतरही वेंडर्सकडे चौकशी करून रीतसर प्रक्रिया केली जाईल. त्यानंतर पोलिसांच्या मदतीला स्मार्ट सिटीच्या निधीतून सामग्री पोहोचण्याची शक्यता आहे.

पोलिस आयुक्तालयामध्ये स्मार्ट सिटीच्या प्रमुख अधिकाऱ्यांची नुकतीच बैठक झाली. आयुक्त जयंत नाईकनवरे (Commissioner Jayant Naiknvare) यांच्यासह उपायुक्त व सहायक आयुक्तांसह स्मार्ट सिटीचे सीईओ (Smart City CEO) सुमंत मोरे (Sumant More) आणि इतर अधिकारी उपस्थित होते. गत महिन्यात झालेल्या बैठकीत 'झीरो माइल' ही वाहतूक सुरक्षेसाठीची संकल्पना मांडण्यात आली. यासंदर्भातील काम वाहतूक शाखेसह स्मार्ट सिटी व महापालिकेतर्फे सुरू आहे. यादरम्यान, नाशिक पोलिस आयुक्तालयाने स्मार्ट सिटीकडे नवीन मागणी केली आहे. त्यानुसार अद्ययावत पोलिस ठाणे, आयुक्तालय, इंटरनेट कनेक्टिव्हिटीसाठी स्मार्ट सिटीच्या माध्यमातून सामग्री व निधी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com