स्मार्ट सीटीची आज बैठक

स्मार्ट सीटीची आज बैठक
USER

नाशिक । प्रतिनिधी Nashik

स्मार्ट सिटी कंपनीच्या Smart City Company मनमानी कारभाराचा फटका अवघ्या नाशिकला Nashikबसत आहे. शहरातील विविध भागात स्मार्टने अनेक ठिकाणी लहान मोठे खड्डे खोदून ठेवले आहे तर अत्यंत संथगतीने काम Slow work सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.

कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण असून नागरिक नगरसेवक व लोकप्रतिनिधींना दोषी ठरवत आहे.

या सर्व पार्श्वभूमीवर नुकत्याच झालेल्या महासभेत महापौर सतीश कुलकर्णी यांनी महापालिका आयुक्त कैलास जाधव तसेच संबंधित अधिकारी व संचालक यांची बैठक लावून याबाबत मार्ग काढण्याचे ठरविले होते.

आज सोमवारी सकाळी दहा वाजता स्मार्ट सिटी कंपनी संचालकांची ऑनलाइन बैठक होणार असल्याची माहिती महापौर सतीश कुलकर्णी Mayor Satish Kulkarniयांनी दिली.

Related Stories

No stories found.