‘स्मार्ट सिटी’चा "तो' अहवाल गुलदस्त्यातच

‘स्मार्ट सिटी’चा "तो' अहवाल गुलदस्त्यातच
नाशिक स्मार्ट सिटी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहराला आणखी ‘स्मार्ट’ (Nashik Smart City) करण्यासाठी केंद्र सरकाराने नाशिकची स्मार्ट सिटी प्रकल्पात निवड केली होती. केंद्र सरकार (Central government) थेट कंपनीद्वारे काम करणार म्हटल्यावर नाशिककरांना मोठा आनंद झाला होता....

मात्र आताची परीस्थिती पाहील्यावर नाशिककरांना एक प्रकारे वैताग आल्याचे चित्र आहे. कंपनीविरुध्द रोष जास्त वाढल्यानंतर मनपा मुख्यालयात (Nashik Municipal Corporation) लोकप्रतिनिधी, संचालक मंडळ व कंपनी अधिकार्‍यांची विशेष बैठक मनपा आयुक्तांनी लावली होती.

तर दोन दिवसात सुरू असलेल्या कामांचा अहवाल मागवला होता. आता दोन महिन्यांचा काळ लोटला तरी अहवाल गुलदसत्यातच आहे. यामुळे तर्कवीतर्क लढविले जात आहे.

स्मार्ट सिटी कंपनी (Smart City Company) स्थापन होवून सुमारे चार वर्षे उलटल्यानंतरही स्मार्ट प्रकल्पांचे काम सुमारे दहा ते 15 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकले आहे.

गावठाण विकास (Gavthan Vikas) आणि प्रोजेक्ट गोदा प्रकल्पाची (Project Goda) उडालेली दैना, लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता मनमानी कारभारातून सुरू असलेली जनतेच्या पैशांची उधळपट्टी, बेकायदा पदोन्नत्या आणि अनुभवहीन अधिकार्‍यांच्या नियुक्त्या याविषयी लोकप्रतिनिधींमध्ये नाराजीचा सुर आहे.

तर स्मार्ट सिटी कंपनीच्या गैरकारभाराविरोधात थेट केंद्र शासनाकडे तक्रार करण्याचा इशारा देखील स्मार्ट कंपनीच्या संचालकांनी मागच्या बैठकीत दिला होता. प्रलंबित स्मार्ट प्रकल्पांसाठी कालमर्यादा निश्चित करताना यासंदर्भातील वस्तुस्थितीदर्शक अहवाल दोन दिवसात सादर करण्याचे आदेश आयुक्त कैलास जाधव यांनी स्मार्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुमंत मोरे (CEO Smart City Company Nashik) यांना दिले होते.

मात्र त्याला जवळपास दोन महिन्यांचा कालावधी होत आला तरी तो अहवाल कुठे आहे, याचा पत्ता लागत नाही. याबाबत मनपा आयुक्तांना विचारण्यात आल्यावर त्यांनी देखील मीही अहवाल पाहीला नाही, असे उत्तर देत पुढच्या आठवड्यात आढावा बैठक घेणार असल्याची माहिती दिली.

गावठाण विकास योजना, प्रोजेक्ट गोदासह स्मार्ट सिटी कंपनीमार्फत सुरू असलेल्या स्मार्ट प्रकल्पांतील अनागोेंदीमुळे नाराजी आहे.

गावठाण विकास योजनेअंतर्गत धुमाळ पाईंट ते नेहरू चौक दरम्यान रस्त्याच्या कामातील अनागोंदी, लोकप्रतिनिधींना विश्वासात न घेता अधिकार्‍यांनी केलेल्या मनमानी कारभारामुळे निर्माण झालेली स्मार्ट कोंडी, कामाची मुदत संपून सहा महिन्यांचा कालावधी उलटला तरी अहिल्यादेवी होळकर पुलाखाली गोदावरी नदीवर मॅकेनिकल गेट (Mechanical Gate) बसविण्याचे प्रलंबित राहिलेले काम, गोदाघाट सौदर्यींकरण योजनेतील कामे पूराच्या पाण्यात वाहून गेल्याने या योजनेच्या भवितव्याविषयी निर्माण झालेले प्रश्न, याविषयी महापौर तथा संचालक सतीश कुलकर्णी (Satish Kulkarni), स्थायी समिती सभापती गणेश गिते (Ganesh Gite), विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते (Ajay Boraste), सभागृहनेते कमलेश बोडके (Kamalesh Bodake), कॉँग्रेस गटनेते शाहू खैरे (Shahu Khaire), गुरूमित बग्गा (Gurmit Bagga) यांनी स्मार्ट कंपनीच्या अधिकार्‍यांची झाडाझडती घेतली होती.

तरी पाहिजे त्या प्रमाणात अद्याप स्मार्ट सिटी कंपनीने आपल्या कामकाजात बदल केले नसल्याचे दिसत नाही.

यामुळे महापालिका आयुक्त पुढच्या आठवड्यात आढावा बैठक घेणार आहेत, त्यात काय होते याकडे लक्ष लागले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com