स्मार्ट सिटीची आज महत्वाची बैठक; निधी परत घेण्यावर फैसला

स्मार्ट सिटी अध्यक्ष सीताराम कुंटे यांची उपस्थिती
स्मार्ट सिटीची आज महत्वाची बैठक; निधी परत घेण्यावर फैसला

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमधील स्मार्ट सिटी प्रकल्प (Nashik Smart City Project) प्रत्येक कामातच वादग्रस्त ठरला आहे. अद्यापही कामे झालेली दिसत नाहीत. यापार्श्वभूमीवर आज पंचवटीतील स्मार्टसिटी कार्यालयात(Panchvati divisional office smart city office) अध्यक्ष सीताराम कुंटे (Chief Secretory Sitaram Kunte), मुख्य कार्यकारी अधिकारी प्रकाश थविल यांच्या उपस्थितीत आढावा बैठक होणार आहे. यावेळी १०० कोटी रुपये परत घेण्याचा फैसलादेखील होणार असल्याचे समजते....

शहरात स्मार्ट सिटी विरुद्ध महापालिका (Smart City Vs NMC) संघर्ष नेहमीच चव्हाट्यावर आला आहे.गेल्या काही वर्षातील स्मार्टसिटी योजनेचे प्रत्येक कामात काही ना काही अडचणी आल्या आहेत. दुसरीकडे स्मार्ट सिटीचे साडेतीनशे कोटी पडून असल्याचेही महापालिका पदाधिकारी सांगताना दिसतात. महापालिका निवडणुका पुढील वर्षी आहेत, पार्श्वभूमीवर निधी परत न जाता नगरसेवकांच्या मतदारसंघात कामावर खर्च व्हावा असे बोलले जात आहे.

आजच्या बैठकीत स्मार्ट सिटीकडून (Nashik Smart City) निधी परत घेण्याबरोबरच मखमलाबाद प्रकल्पाची माहिती, स्मार्ट पार्किंगच्या (Smart Parking) ठेकेदाराने मागितलेली सवलत, गावठाण विकास प्रकल्पांतर्गत २० रस्त्यांचा समावेश करणे अशा कामांचा समावेश आहे.

स्मार्ट सिटी कंपनीची मुदत संपली असून त्यानंतरदेखील कामे होत आहे, त्यामुळे मुदतवाढ मिळण्याची शक्यता आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com