सरकते जिने, लिफ्टचे काम संथ गतीने

दीड वर्षापासून रखडले काम
सरकते जिने, लिफ्टचे काम संथ गतीने

नाशिकरोड । प्रतिनिधी Nashikroad

नाशिकरोड रेल्वेस्थानकावर ( Nashikroad Railway Station ) सध्या प्लॅटफॉर्म क्रमांक चार वर सरकते जिन्याचे काम सुरू असून हे काम गेल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. काम धीम्या गतीने सुरू असल्याची बाब येथील प्रवाशांनी व्यक्त केली आहे. लिफ्ट आणि सरकते जिने तत्काळ कार्यान्वित करावे, अशी मागणी रेल्वे प्रवासी संघटनेने केली आहे.

शहराचे मुख्य प्रवेशद्वार म्हणून नाशिकरोड रेल्वे स्थानकाकडे बघितले जाते. या ठिकाणाहून दररोज हजारो प्रवासी ये-जा करतात. नाशिकरोड रेल्वे स्थानकाचा नुकताच सर्वे करण्यात आला असून या ठिकाणी एकाच इमारतीत सर्व प्रशासकीय कार्यालय असणार आहेत. शिवाय रेल्वे परिसरातील कार्पोरेट व्यवसायाला ऊर्जितावस्था देण्यासाठी येथे कार्पोरेट दुकाने थाटली जाणार आहेत.

तसेच प्रवाशांसाठी हायटेक सोयीसुविधा निर्माण करणार असल्याचे सांगण्यात आले आहे. मात्र लॉकडाऊनच्या काळात सरकते जिने आणि लिफ्टचे काम सुरु करण्यात आले होते. मात्र दीड वर्ष झाले तरीही हे काम सुरूच आहे. सदरचे काम अतिशय संथ गतीने सुरू असल्याचे प्रवासी संघटनेचे पदाधिकार्‍यांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांना हायटेक सोयीसुविधा मिळत नसून अनेक दिवसांपासून चाललेले हे काम तत्काळ मार्गी लावावे अशी मागणी प्रवासी संघटनेने व प्रवाशांनी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com